परराज्यातून येणाऱ्या ग्राहकांसाठी नियम शिथिल करा; नागरीकांकडून मागणी

गोवा आणि महाराष्ट्रातील पर्यटक (Tourists)आणि ग्राहक (Customer)बेळगावात येण्यास वाढत्या कोरोनामुळे घाबरत आहेत. अशातच त्यांना अनेकदा वाहतूक पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
परराज्यातून येणाऱ्या ग्राहकांसाठी नियम शिथिल करा; नागरीकांकडून मागणी
शहरात पोलिसांच्या बंदोबस्त Dainik Gomantak

बेळगाव: कोरोनामुळे (Covid-19)चार महिन्यांच्या भीषण परिस्थितीनंतर, गणपती बाप्पाने बेळगाव बाजारात नवीन आशा पल्लवित झाल्या आहेत. ज्या मुख्यत्वे गोव्यातील ग्राहकांवर अवलंबून आहे. बेळगाव (Belgaum)आणि गोव्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असताना आणि दोन्ही राज्यांत कमीअधिक प्रमाणात लॉकडाऊन (lockdown)शिथिल करण्यात येत आहे. यामुळे बेळगाव बाजार पूर्व स्थितीत परत येत असल्याचे दिसून येत आहे. गोमंतकीयांनी खरेदीसाठी आता बेळगावला भेट देण्यास सुरुवात होत आहे.

गेल्या चार महिन्यांपासून करोनामुळे भयानक स्थिती होती. ज्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्यानंतर शनिवार व रविवार विकेएंड कर्फ्यू लागू केला होता. तसेच कर्मचाऱ्यांनाही आर्थिक पाठबळ द्यावे लागले. या चार महिन्यांत सर्वांना कठीण काळातून जावे लागले होते, कारण विक्री पूर्णपणे बंद झाली होती. असे बेळगावातील मंगलदीप आस्थापनाचे राजू खोडा यांनी माध्यमांना सांगितले.

शहरात पोलिसांच्या बंदोबस्त
बेळगाव, दावणगेरी आणि महाराष्ट्रातून आयात सुरूच, पण विक्रीत घट

गेल्या आठवड्यापासून गणेशोत्सवास सुरूवात झाली आहे. हा सण म्हणजे नागरिकांच्या आवडीचा आहे त्यातून त्यांना उर्जा मिळते. येथील कापड बाजारातील परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आणि पाऊस कमी होण्याची ते वाट पाहत आहेत. जेणेकरून पूर्वीप्रमाणे दिवस परत येतील.

गेल्याच आठवड्यात विकेएंड कर्फ्यू (Weekend curfew)मागे घेण्यात आला. त्यानंतर गोमंतकीय ग्राहकांनी हळूहळू बेळगाव बाजारपेठेला भेट देणे सुरू केले. यामुळे येथील परिस्थिती आशादायक असल्याचे दिसून येते. बेळगावात कोरोनाची स्थिती सुधारली आहे. कारण कोविड पॉझिटिव्हीटीचा दर कमी झाला आहे. यामुळे गोमंतकीय ग्राहकांनी आता बेळगाव बाजाराला भेट द्यावी, असे द रेमंड आस्थापनाचे सुरेश पोरवाल म्हणाले.

दरम्यान, बेळगावात येणाऱ्या वाहन मालकांना विनाकारण त्रास आहे. आणि याच्या वाढत्या तक्रारी येत असल्याने व्यापारी संघटनांनी शहर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात पोलिसांच्या बंदोबस्त
परिवहन महामंडळाच्या बेळगाव आगाराला अजब आदेशांचा आर्थिक फटका

गोवा (Goa)आणि महाराष्ट्राशिवाय(maharashtra) बेळगाव बाजार हा टिकू शकत नाही, असे अधिकाऱ्यांना समजले पाहिजे. तथापि, गोवा आणि महाराष्ट्रातील पर्यटक आणि ग्राहक बेळगावात येण्यास वाढत्या कोरोनामुळे घाबरत आहेत. अशातच त्यांना अनेकदा वाहतूक पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी हे वारंवार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेले आहे. पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर करणार आहेत. जेणेकरून येणाऱ्या पर्यटक आणि ग्राहकांना पोलिसांकडून विनाकारण त्रास होणार नाही. यामुळे बेळगाव बाजारपेठा मोठ्या तोट्यात गेल्यानंतर पुन्हा सुरळीत होण्यास मदत होईल, असे बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांनी माध्यमांना सांगितले.

बेळगावातील व्यापाऱ्यांना (merchants)भविष्यात चांगले दिवस येतील, अशी आशा बाळगून आहेत. त्या व्यापाऱ्यांनी गोमंतकीयांना खरेदीसाठी आणि विकएंड साठी बेळगाव शहराला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com