ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रिलायन्स "मिशन मोडवर"; 24 टँकर केले एअरलिफ्ट

दैनिक गोमंतक
शनिवार, 1 मे 2021

मुकेश अंबानी हे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुढे आल्याचे दिसते आहे.

आशिया आणि भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्री आणि त्या कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुढे आल्याचे दिसते आहे. देशातील अनेक ठिकाणी  कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिनचा तुटवडा भासल्यामुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या जामनगर येथील रिफाइनरीमध्ये दिवसाला 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. (Reliance airlifts 24 tankers for oxygen supply)

भारताच्या वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनपैकी (Oxygen) 11 टक्के ऑक्सिजन एकटी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) मध्ये तयार केला जातो आहे. तर प्रत्येकी 10 रुग्णांपैकी एका रुग्णाला रिलायन्समध्ये निर्माण झालेला ऑक्सिजन दिला जात असल्याचे समजते आहे. स्वतः मुकेश अंबानी यांच्या देखरेखीखाली रिलायन्सचे मिशन ऑक्सिजन सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. जामनगर मध्ये असलेल्या रिफाइनरीमध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन तयार करणे आणि आवश्यकता असेलेल्या राज्यांपर्यंत लवकरात लवकर हा ऑक्सिजन पोहोचवण्यातही वाहतुकीची क्षमता वाढवणे अश्या दोन पातळ्यांवर रिलायन्सचे काम सुरु आहे.

रिलायन्सच्या जामनगर येथील रिफाइनरीमध्ये कच्या तेलापासून डिझेल आणि पेट्रोल सारख्या इंधनाची निर्मिती केली जाते. यापूर्वी या रिफाइनरीमध्ये मेडिकल ऑक्सिजन तयार केला जात नव्हता. मात्र कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्याच अनुशंघाने रिलायन्सने ऑक्सिजन निर्मीचे काम सूर केले आहे. अतिशय कमी वेळेत रिलायन्सने आपल्या उत्पादनाची क्षमता 1000 मेट्रिक टन एवढी वाढवली आहे. जवळपास 1 लाख रुग्णांना पुरेल एवढा हा ऑक्सिजन असल्याचा अंदाज आहे. 

भारतात 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणासाठी कोणकोणत्या लसी वापरल्या जाताय?

एप्रिलमह्ये 15000 मेट्रिक टन तर महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यन्त 55000 मेट्रिक टन एवढ्या मेडिकल ऑक्सिजनचा मोफत पुरवठा रिलायन्सकडून केला गेला आहे. मात्र सध्या देशात ऑक्सिजनच्या लोडींग आणि वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. रिलायन्सने नायट्रोजन टँकरचे रूपांतर ऑक्सिजन टँकरमध्ये करून यावर तोडगा काढला आहे. या व्यतिरिक्त रिलायन्सने सौदी अरब, जर्मनी, बेल्जीयम, नेदरलँड आणि थायलंड मधून 24 ऑक्सिजन टँकर (Oxygen Tankers) एअरलिफ्ट (Airlift) केल्याचे समजते आहे. 

 
 

 

संबंधित बातम्या