रिलायन्सची '5 जी' सेवा लवकरच सुरु होणार

 रिलायन्सची '5 जी' सेवा लवकरच सुरु होणार
Mukesh.jpg

मुंबई: रिलायन्सने(Reliance) भविष्यात ‘ग्रीन एनर्जी’(Green Energy) वर लक्ष केंद्रित करणार असल्याची घोषणा कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांनी बुधवारी बोलताना केली आहे. मुख्य म्हणजे ही कंपनी देशातील पहिली 5 जी (5g) सेवा सुरू करण्यास तयार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Reliance's '5G' service will be launched soon)

रिलायन्स इंडस्ट्रीजची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी  नवनवीन कल्पना मांडत कंपनी कशी पुढे नेता येईल यावर मार्गदर्शन केले.  
ते म्हणाले, कंपनीने एक स्वस्त स्मार्ट फोन 'जिओफोन नेक्स्ट' देखील बाजारात आणला जो 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीला बाजारात उपलब्ध होईल. कंपनीने हा फोन गूगलच्या सहकार्याने बनविला आहे.
‘ग्रीन एनर्जी’ अंतर्गत जामनगरमध्ये धीरूभाई ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्स बांधले जाणार आहे. तसेच मुंबईत जिओ इन्स्टिट्यूट सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमने जागतिक कंपनी बनण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन ते पूर्णही केले आहे. याबाबत त्यांनी कर्मचारी, सहकारी, भागीदार, केंद्र व राज्य सरकारे, भागधारक आणि गुंतवणूकदारांचे आभार मानले आहेत. आपल्या देशावर कोरोनाचे संकट असताना आम्हाला देशाची काळजी आहे. या कठीण काळात आम्ही आमच्या सर्व   कर्मचार्‍यांची काळजी घेत आहोत. कंपनीच्या बर्‍याच कर्मचार्‍यांनी आणि ज्या भागधारकांना कोरोनाच्या आजारात आपल्या माणसांना गमवावे लागले आहे आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. कोरोनाने सर्व देशभर थैमान घातले असताना सुद्धा आरआयएलने २०२०-२१ आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे. गेल्या एजीएमपासून आतापर्यंत आमचा व्यवसाय आणि वित्त अपेक्षेपेक्षा जास्त वाढले आहे. परंतु आम्हाला सर्वात आनंद आहे की या कठीण काळात मानवतेची सेवा करण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले आहेत. रिलायन्स परिवाराने कोरोनाच्या काळात उत्तम काम केले आहे. 
रिलायन्स फाउंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांनी एजीएम दरम्यान कोरोनामधून सुटकेसाठी केलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com