महाराष्ट्रात मिळणार रेमडेसिव्हिर

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

‘हितेरो’ कंपनीकडून प्रथम पाच राज्यांत वितरण

नवी दिल्ली

कोरोनाचा सर्वाधिक प्रसार असलेल्या महाराष्ट्रासह पाच राज्यांना दिलासा मिळणार आहे. हैदराबादमधील ‘हितेरो’ ही औषध कंपनी या राज्यांना कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर औषधाच्या २० हजार बाटल्या देणार आहे. कोरोनावर प्रायोगिक चाचण्या केलेल्या रेमडेसिव्हिरची जनआवृत्तीची निर्मिती आणि वितरण करण्यास ‘हितेरो’ला परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेतील ‘जिलिड सायन्सेस आयएनसी’ ही कंपनी रेमडेसिव्हिरची मूळ उत्पादक आहे.

पहिल्या टप्प्यात
- महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू व तेलंगण या राज्यांना वाटप
- ‘कोव्हिफॉर’ या ब्रँडखाली वितरण होणार

किंमत व डोस
- १०० मिलिग्रॅम बाटलीची किंमत पाच हजार ४०० रुपये
- प्रौढ आणि बालरुग्णांना पहिल्या दिवशी एकदा २०० मिलिग्रॅमचा डोस
- पुढील पाच दिवस रोज १०० मिलिग्रॅमचा एक डोस
- अमेरिकेत मात्र अद्याप रेमडेसिव्हिरची किंमत जाहीर झालेली नाही

दुसऱ्या टप्‍प्यातील वितरण
- कोलकता, इंदूर, भोपाळ, लखनौ, पाटणा, भुवनेश्‍वर, रांची, विजयवाडा, कोची, तिरुअनंतपुरम

औषधनिर्मिती
- तीन-चार आठवड्यांमध्ये एक लाख बाटल्यांचे उद्दिष्ट
- सध्या कंपनीच्या हैदराबादमधील कारखान्यात उत्पादन सुरू
- कंपनीच्या विशाखापट्टणमधील कारखान्यात प्रत्यक्ष औषधातील घटकांची निर्मिती

सिप्ला’लाही परवानगी
- औषधाची निर्मिती आणि विक्रीसाठी सिप्ला या कंपनीलाही परवाना
- औषधाची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा कमी असेल, अशी ‘सिप्ला’ची माहिती

औषधाची उपलब्धता
- हे दुकानांमधून मिळणार नाही
- औषध रुग्णालय, सरकारच्या माध्यमातून ते उपलब्ध होणार

यकृताचे विकार, मूत्रपिंड निकामी झालेले रुग्ण, गर्भवती व स्तनदा महिला, १२ वर्षांखालील मुलांना हे औषध देता येणार नाही.
- वास्मी कृष्णा बंडी, व्यवस्थापकीय संचालक, हितेरो कंपनी

संबंधित बातम्या