नर्स-डॉक्टर्सचा काळा बाजार! 25 रुपयांच्या नकली 'रेमडीसीव्हीर'ची हजारात विक्री

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

मध्य प्रदेशातील रतलाम येथे बनावट रेमडीसीव्हीर इंजेक्शन बनविण्याचे मोठे रॅकेट पकडले गेले आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम येथे बनावट रेमडीसीव्हीर इंजेक्शन बनविण्याचे मोठे रॅकेट पकडले गेले आहे. एक तरुण हे सर्व आपल्या नर्स बहिणीसोबत मिळून करत होता. ती बहीण त्याला मेडिकल कॉलेजमधून रेमेडिसवीर इंजेक्शनची रिकामी बॉटल आणून  देत ​​असे. भाऊ त्यात सामान्य अँटीबायोटिक सेफ्ट्रिआक्सोन पावडर मिसळायचा आणि फेवीक्विकने पुन्हा बॉटल बंद करायचा. इंजेक्शनच्या रिकाम्या खोक्यावर लिहिलेल्या रुग्णाची नावे सॅनिटायझरने मिटवून ब्लॅकचा धंधा करणाऱ्या विक्रेत्यांना 6 ते 8 हजार रुपयांना विकत असे. (Remdesivir Black Marketing: Doctor-nurse in MP sells life saving drug for exorbitant price)

'आम्हाला लोकांचे जीव वाचवायचे आहेत, आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही...

दलालांच्या माध्यमातून हे इंजेक्शन ज्यांना गरज आहे त्यांना 30 ते 35 हजार रुपयांना विकले जायचे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये रतलाममधील जीवनश हॉस्पिटलचे डॉ.उत्सव नायक, डॉ. यशपाल सिंह, वैद्यकीय व्यावसायिक प्रणव जोशी, मेडिकल कॉलेजच्या नर्स रीना प्रजापती, रीनाचा भाऊ पंकज प्रजापती, जिल्हा रुग्णालयातील गोपाल मालवीय आणि रोहित मालवीय यांचा समावेश आहे.

अशा पकडले आरोपी
शनिवारी रात्री पोलिसांनी जीवांश हॉस्पिटलवर छापा टाकला आणि तेथील दोन ड्युटी डॉक्टरांना 30 हजार रुपयाला इंजेकशन देताना रंगे हात पकडले. येथूनच डॉ.उत्सव नायक आणि डॉ. यशपाल सिंह यांना पोलिसांनी अटक केली. चौकशी दरम्यान उघडकीस आलेल्या फरार आरोपी  प्रणव जोशी याला मंदसौर येथून अटक करण्यात आली. यानंतर मेडिकल कॉलेजच्या नर्स  रीना प्रजापती, तिचा भाऊ पंकज प्रजापती, गोपाल मालवीय आणि रोहित मालवीय यांची नावे समोर आली. सोमवारी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

पोलिसांनी आरोपींकडून बनावट इंजेक्शन, साधने आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त केलेली बनावट इंजेक्शन्स आणि साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी सागरल लॅबला पाठविले जाईल. याप्रकरणी पोलिस आरोपींकडे चौकशी करत आहेत. आयुष्य वाचवणारे इंजेक्शन ब्लॅक करणार्‍यांवर पोलिस बंदी घालण्याची तयारी करीत आहेत.

संबंधित बातम्या