आरोपपत्राविरोधात अर्णव गोस्वामींचा अर्ज

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे.

मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. या आरोपपत्राची दखल अलिबाग न्यायालयाने घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी गोस्वामी यांच्यासह कंत्राटदार फिरोज शेख आणि नीतेश सारडा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्याआधी गोस्वामी यांनी या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती द्यावी आणि तपास ‘सीबीआय’कडे वर्ग करावा, अशी मागणी दोन स्वतंत्र अर्जाद्वारे केली आहे; मात्र पोलिसांनी काल दाखल केलेल्या अर्जामुळे आज त्यांनी पुन्हा नवीन अर्ज केला. 

न्यायालयाच्या परवानगीशिवाय हा तपास सुरू झाला आहे, असा दावा गोस्वामी यांनी केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एक हजार ९१४ पानी आरोपपत्रात एकूण ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.

संबंधित बातम्या