Jammu And Kashmir: सरकार 'मिशन मोड'वर, काश्मिरी पंडितांसाठी बांधली जातायेत आलिशान घरे

Jammu And Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये जिथे अतिरेकी टार्गेट किलिंगच्या भ्याड घटना घडवत आहेत, तिथे सरकार आणि सुरक्षा दलही मिशन मोडवर आहेत.
Quarters
QuartersDainik Gomantak

Jammu And Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये जिथे अतिरेकी टार्गेट किलिंगच्या भ्याड घटना घडवत आहेत, तिथे सरकार आणि सुरक्षा दलही मिशन मोडवर आहेत. या भागात, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात निवासी क्वार्टरचे बांधकाम जोरात सुरु आहे. हे काश्मिरी पंडितांसाठी बनवले जात आहे.

बारामुल्लामध्ये प्रकल्पाचे काम जोरात सुरु

खरे तर, बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यातील फतेहपोरा भागातील एक व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे. सरकार या घरांच्या बांधकामाला गती देत ​​आहे. अहवालानुसार, सध्या या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 42 कोटी रुपये आहे. या नवीन ट्रान्झिट निवासात सुमारे 320 काश्मिरी पंडित कुटुंबे राहतील.

Quarters
Jammu And Kashmir: राजनाथ सिंह म्हणाले, 'POK भारतातच भाग, युद्ध झाले तर...'

स्थानिकांकडून कौतुक होत आहे

पंतप्रधान रोजगार पॅकेज अंतर्गत कार्यरत असलेल्या काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनांतर्गत हे काम केले जात असल्याची माहितीही देण्यात आली आहे. सरकारच्या या उपक्रमाचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे. सरकार खूप चांगले काम करत असल्याचेही एका स्थानिक तरुणाने म्हटले आहे. या माध्यमातून एकेकाळी येथून हद्दपार झालेल्या लोकांना राहण्यासाठी जागा मिळेल.

Quarters
Jammu And Kashmir: कलम 370 रद्द केल्यापासून आतापर्यंत 118 नागरिकांचा मृत्यू

हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल

सध्या इथे काश्मिरी पंडित मजुरांसाठी हे बांधकाम केले जात आहे. दुसरीकडे मात्र, याविषयी अधिक तपशीलवार माहिती मिळणे अपेक्षित आहे. बारामुल्लामधील हे चित्र अशावेळी समोर आले आहे, जेव्हा जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) सर्व जिल्ह्यांमध्ये दहशतवादी (Terrorist) पुन्हा सक्रिय होत आहेत. दैनंदिन टार्गेट किलिंगच्या घटना वाढत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com