‘सीमेवर शांतता राखण्यास रहिवाशांचा महत्त्वाचा सहभाग’

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

‘‘सीमा भागांत शांतता राखण्यास लष्कराबरोबरच तेथील नागरिकांची महत्त्वाची भूमिका आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केले.

 
भूज : ‘‘सीमा भागांत शांतता राखण्यास लष्कराबरोबरच तेथील नागरिकांची महत्त्वाची भूमिका आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केले.

कच्छ जिल्ह्यात आयोजित केलेल्या ‘विकासोत्सव २०२०’ या कार्यक्रमात कच्छ, बनासकांठा आणि पाटण या सीमेवरील जिल्ह्यांतील सरपंचांसमोर बोलताना ते म्हणाले की, अंतर्गत गावांना ज्या सुविधा मिळतात त्या सीमेवरील गावांतील रहिवाशांना मिळाव्यात हे या विकासोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

कच्छमधील भूकंपानंतर मी २००१मध्ये भूजला आलो होतो, तेव्हा येथे सर्व उद्‍ध्वस्त झाले होते. आता मॉल व अन्य इमारती मोठ्या संख्येने उभ्या आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या एका प्रदर्शनाचे उद्‍घाटनही शहा यांनी केले. 

संबंधित बातम्या