कलम ३७० पुन्हा लागू करा : अब्दुल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी आज लोकसभेत केली. तसे केल्यानंतरच जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असा दावाही अब्दुल्ला यांनी केला

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी आज लोकसभेत केली. तसे केल्यानंतरच जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असा दावाही अब्दुल्ला यांनी केला. 

मागील वर्षी पाच ऑगस्टला संसदेने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम हटविण्याचा आणि राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर वर्षभराने संसदेच्या पटलावर प्रथमच ३७० कलम पुन्हा लागू करण्याची मागणी झाली आहे. लोकसभेमध्ये शून्य काळात हा मुद्दा उपस्थित करताना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व खासदार डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर अशांत असल्याचा दावा केला. मध्य काश्मीरमध्ये चकमकी सुरू असून कोठेही शांतता नाही. पाच ऑगस्टला घेतलेला निर्णयाचा फेरविचार करावा. त्याखेरीज काश्मीरमध्ये शांतता नांदणार नाही, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या