अ‍ॅमेझॉनला भारतात कडाडून विरोध; भारतीय नियमांचे उल्लंघन?
Retailers in India strongly oppose Amazon

अ‍ॅमेझॉनला भारतात कडाडून विरोध; भारतीय नियमांचे उल्लंघन?

नवी दिल्ली: ई-कॉमर्स दिग्गज कंपनी अ‍ॅमेझॉन देशातील कायद्यांचा भडका उडवून व्यवसाय कसा करतो, याविषयी रॉयटर्सने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला भारतात सध्या विरोध होत आहे. अ‍ॅमेझॉन देशातील कायद्यांचे उल्लंघन करून भारतात कसे कार्यरत आहे, असे या अहवालात सांगितले जात आहे. अहवाल प्रकाशित झालेल्या माहितीनुसार अमेझॉन नियमांचे उल्लंघन करून काम करत असल्याचे म्हटले आहे. आता भारतीय किरकोळ विक्रेत्यांनी सरकारकडे ही बाब गांभीर्याने घेण्याची व देशातील अ‍ॅमेझॉनच्या व्यवसायावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

आता ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन विरोधात किरकोळ विक्रेते पुढे आले आहेत.  अ‍ॅमेझॉनमार्फत देशातील एकूण ऑनलाइन विक्रीपैकी दोन तृतीयांश विक्री केवळ 35 विक्रेते करीत आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की अ‍ॅमेझॉन केवळ काही विक्रेत्यांकडेच लक्ष देत आहे. हा खुलासा झाल्यानंतर देशातील किरकोळ व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

अमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म ने भारतीय नियामांकांशी विश्वासघात केला आणि गोपनीय धोरण तयार केले आहे. 2012 ते 2019 या कालावधीच्या दरम्यान कागदपत्रांमधील संदर्भ या अहवालात देण्यात आले आहेत. हा कंपनीच्या अधिकृत संवादाचा एक भाग आहे, ज्यात कंपनीचे मोठे अधिकारी एकमेकांशी संवाद साधत असतात. भारतात अ‍ॅमेझॉनच्या कामकाजावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. "हा अहवाल पुर्णत: चूकीचा आहे. अमेझॉनने भारतीय कायद्य्यांचे पालन केले आहे. अमेझॉनला बदमान करण्यासाठी असा खोटा अहवाल प्रसिद्ध केला गेला आहे," असे स्पष्टीकरण अमेझॉनने दिले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com