'कृषी कायदे रद्द झाल्यावरच घरवापसी'- राकेश टिकैत

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

कृषी  कायदे  रद्द  झाल्यावरच  घर  वापसी  होणार, आमचा  मंच  आणि  पंच  सारखाच  राहणार  आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या  तीन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. केंद्र  सरकार आणि  शेतकरी नेते यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र कृषी कायद्यांच्या बाबतीत अद्याप  ही  तोडगा  निघू  शकला  नाही. शेतकरी संघटना केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर ठाम आहेत. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय घरवापसी करणार नसल्यचे शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय  किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी  मोदी सरकारला  इशारा  दिला आहे.

‘’कृषी  कायदे  रद्द  झाल्यावरच  घर  वापसी  होणार, आमचा  मंच  आणि  पंच  सारखाच  राहणार  आहे. सिंघू  सीमा  हे आमचे  कार्यालय  असणार आहे. केंद्र सरकारला आमच्या  बरोबर  चर्चा  करायची  असल्यास  येणाऱ्या  दहा  दिवसांत  नाही तर पुढच्या  वर्षी  आम्ही  तयार  आहोत. दिल्ली  पोलिसांकडून  लावण्यात आलेले खिळे काढल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही’’  असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले.

तसेच पुढेही  म्हणाले, आम्ही  लोक  पंचायती  प्रणालीला  माणनारे  लोक  आहोत. आम्ही  लोक  निर्णयाच्या  वेळी  पंच  बदलत  नाही  त्याचबरोबर  मंचही  बदलत  नाही. केंद्र सरकार आणि आमच्यात चर्चेची जी सीमारेषा  होती  त्याच  सीमारेषेवर  सरकारने चर्चा  करावी. भारत  स्वातंत्र  झाला  असला तरी  गुजरात  कोणत्या  कारणासाठी  कैद आहे ?  गुजरात मधील सामान्य  लोकांना  दिल्लीला  येवू  दिलं  जात  नाही, आणि  ज्या लोकांना दिल्लीला येण्याची इच्छा आहे, त्यांना जबरदस्तीने तुरुंगात टाकले जात आहे. आम्ही  येणाऱ्या  काळात  गुजरातलाही  जाऊ’’.

ट्विटरने सरकारचा आदेश मान्य न केल्यास,अधिकाऱ्यांना अटकदेखील होऊ शकते

कृषी  कायद्याच्य़ा  विरोधात  देशभरातील  शेतकरी केंद्र सरकारच्या  विरोधात  एकत्र येत  आहे. शेतकरी आंदोलनाला देशातून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून  ही  पांठीबा मिळत आहेत. अमेरिकेच्य़ा नवनिर्वाचीत उपाध्यक्षा  कमला  हॅरिस  यांची  भाची  मीना हॅरिस, पॉपस्टार रिहाना, पर्यावरणतज्ञ ग्रेटा थ्रेनबर्ग  तसेच  मिया खलिफा  यांनी  या आंदोलनाला  आपला  पाठिंबा  दर्शवला आहे.

संबंधित बातम्या