Monsoon Update: देशातून मॉन्सूनच्या एग्झिटला सुरुवात

पुढील चार दिवसांच राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह मध्य प्रदेशातील काही भागातून मॉन्सूनची (Monsoon) एग्झिट (Exit) होऊ शकते.
Monsoon Update: देशातून मॉन्सूनच्या एग्झिटला सुरुवात
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनच्या (Monsoon) भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. Dainik Gomantak

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनच्या (Monsoon) भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. राजस्थान (Rajasthan) आणि गुजरातमधून (Gujarat) मॉन्सूनची एग्झिट (Exit) झाली आहे. तसेच उत्तर भारतातून देखील त्याचा परतीचा प्रवास लवकरच होण्याचा अंदाज आहे.

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनच्या (Monsoon) भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
Monsoon update: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा तडाखा, कोठे होणार पाऊस?

यंदा 13 जुलैला राजस्थानसह संपुर्ण भारतात व्यापल्यानंतर मॉन्सूनचा 2 महिने 24 दिवस त्याचा मुक्काम होता. आता मात्र त्याने परतीची वाट धरली आहे. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार 17 सप्टेंबर रोजीच मॉन्सूनची एग्झिट होणे अपेक्षीत होते. परंतु यंदा तो 19 दिवस उशीराने माघारी फिरत आहे.

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनच्या (Monsoon) भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
Monsoon Update:देशात आज अनेक राज्यात मुसळधार पाऊस,तर चक्रीवादळ ओसरण्यास सुरूवात

पश्चिम राजस्थान, गुजरातमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. आर्द्रता देखील कमी झाली आहे. तसेच वाऱ्यांची दिशा देखील बदलली असल्याने मॉन्सूने एग्झिट घेतल्याचे सांगितले आहे. राजस्थानच्या बिकानेर, जोधपूर, जालोर आणि भूजपर्यंतच्या भागामधून मॉन्सून परतला आहे. देशाच्या आणखी काही भागातून देखील मॉन्सूनची एग्झिट सुरु झाली आहे. पुढील चार दिवसांच राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह मध्य प्रदेशातील काही भागातून मॉन्सूनची एग्झिट होऊ शकते. अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.