कोणत्याही धर्माचा जीवनसाथी निवडणे अंगभूत अधिकार

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

लव्ह जिहादचे देशभर वादग्रस्त पडसाद उमटत असतानाच अलाहाबाद उच्च न्यायालयाने आधीच्या निर्णयाला छेद देणारा निकाल दिला आहे.

अलाहाबाद: लव्ह जिहादचे देशभर वादग्रस्त पडसाद उमटत असतानाच अलाहाबाद उच्च न्यायालयाने आधीच्या निर्णयाला छेद देणारा निकाल दिला आहे. त्यानुसार कोणत्याही धर्माचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार जगणे व वैयक्तिक स्वातंत्र्याशी अंगभूत आहे असे खंडपीठाने सांगितले.

वास्तविक सप्टेंबरमध्ये तसेच २०१४ मध्ये कथित धर्मांतरानंतर झालेल्या विवाहांबाबत न्यायालयाने प्रतिकूल मत नोंदविले होते, पण हे दोन निर्णय कायद्यानुसार चांगले नसल्याचे न्या. पंकज नकवी आणि विवेक अगरवाल यांनी स्पष्ट केले.

मुस्लीम धर्म स्वीकारून लग्न केलेल्या मुलीच्या पित्याने तिच्या नवऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल न्यायालयाने फेटाळला. त्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्याबाबत घटनेतील २१व्या कलमाचा दाखला देण्यात आला. वैयक्तिक नात्यातील हस्तक्षेप दोन व्यक्तींच्या स्वातंत्र्याच्या हक्कावरील अतिक्रमण ठरते असे सांगण्यात आले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशी राज्ये लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याच्या मार्गावर असतानाच हा निर्णय आला आहे.

संबंधित बातम्या