"धार्मिक अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा नाही",मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी सुनावणीसाठी आलेल्या एका जनहीत याचिकेवर सुनावणी करताना "जगण्याचा अधिकार हा धार्मिक  अधिकारापेक्षा अधिक महत्वाचा असल्याचं मतं नोंदवल".

 

मद्रास: व्यक्तीचा धार्मिक अधिकार त्याच्या जीवन जगण्याच्या कार्यप्रणालीपेक्षा कोणत्याही स्थितीत मोठा ठरु शकत नसल्याचं निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.

तमिळनाडुमधील एका मंदिरात महोत्सवाचे आयोजन करताना कोरोनाच्या नियमांचं पालन करुन धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत असे निर्देश राज्य सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने दिले.

मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी सुनावणीसाठी आलेल्या एका जनहीत याचिकेवर सुनावणी करताना "जगण्याचा अधिकार हा धार्मिक  अधिकारापेक्षा अधिक महत्वाचा असल्याचं मत नोंदवल".

सरकार जर कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता धार्मिक स्थळांबाबत काही निर्णय घेत असल्यास आम्ही त्या निर्णांयामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे ही सुणावणी दरम्यान  न्यायालयाने म्हटलं.

त्याचबरोबर न्यायालयाने सुणावणी दरम्यान तिरुचिरापल्ली मधील रंगनाथस्वामी मंदिरामध्ये कोरोना नियमांच पालन करुन उत्सव घेता येणं शक्य आहे का? याचीही पडताळणी करण्याचे निर्देश सरकारांना दिले आहेत.

दरम्यान न्यायालयाने धार्मिक नेत्यांबरोबर चर्चा करुन अहवाल तयार करण्याचे आदेश ही दिले आहेत.पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.

सध्या कोरोना काळात धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता कोरोना नियमांचं पालन करण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात आहे.मात्र भाविकांनी दर्शनासाठी येताना कोरोनाचं योग्य ती काळजी घेतली जाणं आवश्यक आसल्याचं धर्मिक स्थळांचं व्यवस्थापन पाहणाऱ्या प्रशखसनाकडून वारऱवार करण्यात येत आहे.

आणखी वाचा:

मोदी है तो मुमकिन है; “दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही...विकला तर नसेल ना…”, -

संबंधित बातम्या