राज्यसभेत गदारोळ ;आम आदमी पक्षाच्या खासदारांचे निलंबन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सराकरने बनवलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सराकरने बनवलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, मात्र योग्य तो तोडगा निघू शकला नाही. शेतकरी नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेत 6  फेब्रुवारीला  दिल्लीच्या  सीमेनजीक  चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे. दिंवसेदिवस शेतकरी आंदोलन तीव्र होत असतानाच त्याचे पडसाद राज्यसभेतही उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रश्नावर राज्यसभेत चर्चा करण्यात  याव्यात  यासाठी  विरोधकांकड़ून  मागणी  करण्यात  येत  होती.

Farmer Protest: जागतिक सेलिब्रिटिंकडून समर्थन; तर कंगनाने मुरडले नाक 

त्यानंतर शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यासाठी 15 तासांचा वेळ राखून  ठेवण्यात  आला. दरम्यान  राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांनी घोषणा देत गोधंळ घालण्यासाठी सुरुवात केली, यावर राज्य़सभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी या तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. सकाळी राज्य़सभेच्या कामकाजाला  सुरुवात  झाली  मात्र  विरोधकांनी शेतकऱ्यांच्या  प्रश्नावर  चर्चा  करण्यात यावी  यासाठी  विरोधकांनी आक्रमक  होत  राज्यसभेत  मोदी  सरकारला घेरण्याचा प्रयत्न  केला.

Farmer Protest: कृषी कायद्यांवरुन राज्यसभेत गदारोळ; विरोधी पक्षांनी केला...

मात्र  राज्यसभेत  शेतकऱ्यांच्या  प्रश्नावर  चर्चा होण्या आगोदरच  विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्यावर कामकाज तहकूब करण्याची वेळ आली. गोधंळ घालणाऱ्या आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांवर  राज्यसभा सभापतींनी निलंबनाची कारवाई  केली. सभापतींनी ही खासदारावरील कारवाई राज्यसभा नियम क्रमांक 255 अंतर्गंत केली आहे. राज्यसभा सदस्य  सभागृहाच्या  कामकाजाची  शूटिंग  करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांचे  हे  वर्तन  संसदीय शिष्टाचाराला धरून नाही. असं म्हणत राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले होते. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर  सभापती  व्यंकय्या  नायडू  यांनी  सदस्यांची  कानउघडणी  केली.

संबंधित बातम्या