Ripped Jeans: महिलांनी जीन्स घालण्यावरून उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य; विधानसभेत पडसाद

Ripped Jeans Shiv Sena Priyanka Chaturvedi has replied to Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat
Ripped Jeans Shiv Sena Priyanka Chaturvedi has replied to Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat

देहरादून: (Ripped Jeans Shiv Sena Priyanka Chaturvedi has replied to Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat) नव्याने शपथविधी झालेल्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांनी केलेल्या "फाटलेली जीन्स(Ripped Jeans)घातलेल्या महिला" या मुद्वयावर वक्तव्य केले आहे. "समाजात आणि मुलांमध्ये चुकीचा संदेश पाठविला आहे," या टीकेवरुन चर्चेला उधाण आले आहे.

त्यानंतर शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांना, "तुमची विचारसरणी बदला मुख्यमंत्री रावत जी, तरच देश बदलेल” असे प्रतिउत्तर दिले आहे. फाटलेली निळ्या रंगाची जिन्स परिधान केलेला फोटो शेअर करत चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री रावत यांच्या टीकेला कडक प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तिरथसिंग रावत यांच्या विधानाचा तिव्र निषेध केला आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांनी 'फाटलेली जीन्स (Ripped Jeans) घालून स्वत: ला श्रीमंत वडिलांचे मूल समजणाऱ्या तरुणी' या विधानावर महिला नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, कॉंग्रेस प्रवक्त्या गरिमा दासौनी यांनी तिरथसिंग रावत यांच्यावर निशाणा साधला आहे.(Ripped Jeans Shiv Sena Priyanka Chaturvedi has replied to Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat) 

त्याचबरोबर "उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात की त्यांनी खाली पाहिले तेव्हा त्यांना फाटलेली जिन्स दिसली, उघडे गुडघे दिसले. मुख्यमंत्री साहेब, आम्ही जेव्हा तुम्हाला पाहिले तेव्हा आम्हाला फक्त एक मूर्ख माणूस दिसत आहे. आपण राज्य चालवत आहात पण तुमचा दिमाग आम्हाला फाटलेला दिसत आहे," असे ट्विट माहुआ मोइत्रा यांनी केले आहे.

"मुलींच्या ड्रेसवर असभ्य वक्तव्ये मुळीच शोभत नाही, "मुख्यमंत्र्यांसारख्या उंच्चपदावरील व्यक्ती एखाद्याच्या ड्रेसवर असभ्य भाष्य करत नाही,”अशी टीका प्रदेश कॉंग्रेसच्या प्रवक्ते गरिमा दासौनी यांनी केली. "मुख्यमंत्री असल्याने एखाद्याच्या वैयक्तिक वेषभूषेवर भाष्य केलेले प्रमाणपत्र आपल्याला मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी अशी विधाने टाळावे," असा सल्लाही त्यांनी दिला.

"संस्कारांच्या नावावर तरुणांनी विचित्र फॅशन करण्यास सुरुवात केली आहे आणि गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून स्वत: ला मोठ्या वडिलांचे मुलं समजत आहे.(Ripped Jeans Shiv Sena Priyanka Chaturvedi has replied to Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat) अशा प्रकारच्या फॅशनमध्ये मुलीही मागे नाहीत. आजकाल मुली गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालतात खरेदी करण्यासाठी बाजारात जातात आणि जर ती फाटलेली नसेल तर ती कात्रीने कापतात," असे मंगळवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री रावत म्हणाले.

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री रावत यांनी मंगळवारी देहरादून येथे उत्तराखंड राज्य बाल संरक्षण हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत बोलताना असे वक्तव्य केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com