दिल्लीतील कोरोनास्थिती गंभीर..चाचण्या, कोविड वॉर्ड वाढवण्याचे आदेश

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

दिल्लीमध्ये कोविड-१९ महामारीची वाढती रुग्णसंख्या आणि बळींचा आकडा याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची आढावा बैठक घेतली.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कोविड-१९ महामारीची वाढती रुग्णसंख्या आणि बळींचा आकडा याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. राजधानी परिक्षेत्रात आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढविणे आणि आयसीएमआरची फिरती चाचणी केंद्रे आणखी काही भागांमध्ये तैनात करणे आणि कोविड वॉर्ड वाढविणे यासह अनेक निर्देश शहा यांनी बैठकीत दिले.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन  व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  बैठकीला उपस्थित होते. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून महापालिकांच्या हद्दीतील काही रुग्णालयेमध्ये कोविड वॉर्ड वाढविण्याच्या सूचना शहा यांनी केल्या. अतिदक्षता विभागातील कोविड-१९ रुग्णांसाठी राखून न ठेवलेल्या खाटा ही फार मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे शहा यांनी या खाटांची संख्या तातडीने पाचशेपर्यंत, त्यानंतर परिस्थितीनुसार वाढवण्याचे निर्देश दिले. 

संबंधित बातम्या