अक्कड़ बक्कड़ बम्बे बो; पेट्रोल के दाम अब पुरे 100

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

पेट्रोल व डीझेल च्या कीमतीने आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस पेट्रोलच्या कींमतीत वाढ होताना दीसत आहे, पेट्रोल चा दर 90 रुपयांच्या वर गेला आहे. हा दर जानेवारी पासुन वारंवार वाढत आहेत

नवी दिल्ली: पेट्रोल व डीझेल च्या कीमतीने आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस पेट्रोलच्या कींमतीत वाढ होताना दीसत आहे, पेट्रोल चा दर 90 रुपयांच्या वर गेला आहे. हा दर जानेवारी पासुन वारंवार वाढत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे भाव पेट्रोलला आले आहेत. सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणाऱ्या किंमतीने पेट्रोल वाढत आहेत. 

या आधी 16 मे रोजी पेट्रोल आणि डिझलचे दर कमी करण्यात आले होते. मात्र आता पेट्रोल 90 तर डिझेल 80 रुपयांच्या वरती गेले आहे. 16 मे रोजी पेट्रोलच्या दरात 2 रुपये 16 पैसे तर डीझेलच्या दरात 2 रुपये 10 पैसे या दराने कपात करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आजपर्यंत झालेल्या वाढीनंतर नागरिकांना आता आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. आणि त्यांचेही आता बजेट विघडणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार या वाढलेल्या दरांमध्ये राज्य कर किंवा वॅट याचा सामावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात पेट्रोल आणि डीझेल अधिक महाग असेल. सोशल मिडीया आणि फेक व्हॅाट्सॅप मेसेजेस व्हायरल होत आहेत तसेच, विविध पेट्रोलच्या किंमती बाबत कारटुन आणि मिम्स ही व्हायरल होत आहेत.

Union Budget 2021: देशात प्रथमच डिजिटल जनगणना होणार -

संबंधित बातम्या