बिहार विधानसभा निवडणूक: या पक्षाकडे उमेदवारीसाठी आले एवढे अर्ज

उज्ज्वल कुमार
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

बिहार विधासभेची सदस्य संख्या २४३ आहेत. निवडणुकीसाठी ‘आरजेडी’ने इच्छुकांकडून वैयक्तिक माहितीचे अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला असून एका आठवड्यातच ९०० लोकांनी अर्ज केले आहेत.

पाटणा: बिहार विधानसभेत तिकीट मिळण्यासाठी माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय जनता दलाकडे (आरजेडी) आतापर्यंत ९०० इच्छुकांनी स्वतःची माहिती पाठविली आहे. माजी पोलिस संचालक, माजी सनदी अधिकारी आणि बिहार पोलिस दलातील अधिकारीही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

बिहार विधासभेची सदस्य संख्या २४३ आहेत. निवडणुकीसाठी ‘आरजेडी’ने इच्छुकांकडून वैयक्तिक माहितीचे अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला असून एका आठवड्यातच ९०० लोकांनी अर्ज केले आहेत. माजी पोलिस महासंचालक अशोक कुमार गुप्ता यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. आधी हे अर्ज पक्ष कार्यालयात जमा केले जातात. ‘आरजेडी’चे प्रदेश अध्यक्ष जगदानंदसिंह यांच्या नजरेखालून ते गेल्यावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या सरकारी निवासस्थानी ठेवण्यात येत आहेत. पक्षाच्या बैठकीत या अर्जांवर चर्चा होणार आहे. आतापर्यंत आलेल्या अर्जांत एक २४ पानी आहे. बहुतेक अर्जदारांनी लालू प्रसाद यांच्यासह स्वतःचे छायाचित्रही जोडले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने लोकांमध्ये ‘आरजेडी’बद्दल प्रेम असल्याचेच दिसून येते
- जगदानंदसिंह, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय जनता दल

निवडीसाठी मध्यस्थ संस्थेची मदत
सक्षम उमेदवारांची निवड करण्यासाठी ‘आरजेडी’ने एक संस्थेची सेवा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तिकीट वाटपात या संस्थेकडून मिळणाऱ्या माहितीचा आधार घेतला जाणार आहे.

संबंधित बातम्या