बिहार विधानसभेत तुफान हाणामारी; राजद आमदार आणि पोलीस जखमी

दैनिक गोमंतक
मंगळवार, 23 मार्च 2021

राजदचे आमदार सतीश दास हे या हाणामारीत गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीपीआयचे आमदार सत्येंद्र यादव आणि राजदचे आमदार रितलाल यादव यांनाही मार लागल्याचे समजते आहे.

बिहार विधानसभेत(Bihar Assembly) सत्ताधारी पक्षाने सादर केलेल्या पोलीस विधेयकावरून मंगळवारी मोठा गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळाला. या गोंधळात आमदार, पोलीस कर्मचारी आणि पत्रकार जखमी झाल्याचे समजते आहेत. राजदचे आमदार सतीश दास (Satish Das) हे यावेळी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीपीआयचे आमदार सत्येंद्र यादव आणि राजदचे आमदार रितलाल यादव यांनाही मार लागल्याचे समजते आहे. दरम्यान, सतीस दास यांनी पोलिसांनी आपल्याला जबर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. (RJD MLA and Police injured in Storm rages in Bihar Assembly)

सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधी पक्षांमधील वाद एवढा विकोपाला गेल्याने मंगळवारचा दिवस बिहारच्या संसदीय इतिहासाला काळिमा फासणारा ठरला. बिहार सरकारने आणलेल्या विशेष पोलीस विधेयकाला विरोधी पक्ष ठामपणे विरोध करत होता. दरम्यान हे विधेयक सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा  आणणारे विधेयक असल्याचे विरोधी पक्षांचे मत होते, तर हे विशेष पोलीस विधायक (Police Bill) असून याचा सामान्य पोलिसांशी कुठलाही संबंध नसल्यची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. मंगळवारी हे विधेयक पटलावर ठेवले जाणार होते. दरम्यान11 वाजता सभागृहाची कारवाई सुरु होताच विवधि पक्षांनी गोंधळाला सुरुवात केली. यावेळी सभागृहात विरोध पक्षाने उपमुख्यमंत्री किशोर प्रसाद यांच्या हातातून विधेयकाची प्रत हिसकावून ती फेडण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी  सत्ताधारी पक्षाने सुद्धा याचा तीव्र विरोध केला. 

''चहावाला म्हणून म्हणत खिल्ली उडवणारेच आता, चहाच्या मळ्यांमध्ये दिसत...

त्यानंतर सायंकाळी जेव्हा हे विधेयक सभागृहात सादर करण्यात आले, तेव्हा सभागृहात तसेच विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयासमोर विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. एवढ्यावरच न थांबता विरोधी पक्षातील सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाचा दरवाजा दोरीने बांधून केला. विरोधी पक्षातील आमदारांनी गोंधळ सुरु केल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. या दरम्यान निदर्शने करणाऱ्या विरोधी पक्षातील सदस्य आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीत पोलीस कर्मचारी आणि आमदार जखमी झाल्याचे समजते. या घटनेत राजद चे आमदार सतीश दास हे गंभीर जाहमी झाल्याने रुग्णवाहिका बोलावून त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

संबंधित बातम्या