सोनियी गांधींचे जावई निघाले सायकलवरून; पंतप्रधानांना म्हणाले...

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

तेलाच्या वाढत्या किंमती बघता विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. अशातच सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा तेलाच्या वाढत्या दराच्या निषेध करण्याकरीता दिल्लीमध्ये सायकल चालवताना दिसले.

नवी दिल्ली: तेलाच्या वाढत्या किंमती बघता विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. अशातच सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा तेलाच्या वाढत्या दराच्या निषेध करण्याकरीता दिल्लीमध्ये सायकल चालवताना दिसले. रॉबर्ट वड्रा खान मार्केट पासून आपल्या कार्यालयापर्यंत सायकल चालवून गेले आणि तेलाच्या वाढत्या किंमतींचा त्यांनी निषेध केला.

“कधीतरी तुम्ही तुमच्या अलिशान कारमधून बाहेर या आणि सर्वसामान्यांना काय व कसा त्रास होत आहे ते स्वत: पहा. कदाचित हे पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी तेलाचे दर कमी करतील. पंतप्रधान मोदी मागील सरकारांना दोष देतात आणि पुढे जातात, अशी टिका रॉबर्ट वड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

पुद्दुचेरीत कॉंग्रेस सरकार वाचणार की राष्ट्रपती राजवट? या आहेत 4 शक्यता 

इतकेच नाही तर मध्य प्रदेशातील अनेक कॉंग्रेस नेत्यांनीही विधानसभा पर्यंतच सायकल स्वारी करत आणि वाढत्या पेट्रोल किंमतींचा निषेध केला. मध्य प्रदेशात कॉंग्रेस नेते पीसी शर्मा, जीतू पटवारी आणि कुणाल चौधरी यांनी विधानसभेपर्यंत सायकल चालवत नेली.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता कॉंग्रेस नेत्यांनी सायकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आणि केंद्र सरकारविरोधात प्रदर्शन केले. गेल्या दोन दिवसांपासून तेलाच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, परंतु त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी सर्वसामान्यांना त्रासून सोडले  आहे.

याशिवाय द्रमुकचे खासदार दयानिधी सारन यांनी चेन्नईच्या वल्लुवर कोट्टममध्ये एलपीजीच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात निषेध नोंदविला आहे. धरणे प्रात्यक्षिकेदरम्यान खासदारांनी एलपीजी सिलिंडरला पुष्पहार घालून तीन एलपीजी सिलिंडर धरणे आंदोलनाच्या ठिकाणी ठेवले आहे.

 

संबंधित बातम्या