'India चे पंतप्रधान ओबीसी समाजातून येतात...', सफाई कामगाराच्या मुलीने परदेशात उंचावले देशाचे नाव

Rohini Ghawri: घावरी ही इंदूर येथील एका सफाई कामगाराची मुलगी आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिने भारताचे कौतुक केले.
PM Modi
PM ModiDainik Gomantak

Rohini Ghawri: रोहिणी घावरी, जिनेव्हा येथील पीएचडीची विद्यार्थिनी, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे 52 वे संमेलन तिच्या भाषणामुळे चर्चेत आहे.

घावरी ही इंदूर येथील एका सफाई कामगाराची मुलगी आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिने भारताचे कौतुक केले.

ती म्हणाली की, भारताचे राष्ट्रपती आदिवासी समाजातून येतात. पंतप्रधान ओबीसी समाजातून येतात. भारताचे संविधान इतके मजबूत आहे की, मागास जातीतील लोक देशाचे नेतृत्व करु शकतात. त्याचबरोबर हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकतात.

तिने सांगितले की, तिला भारत सरकारकडून एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. यानंतर ट्विटरवर 1 कोटी ट्रेंड करु लागले. रोहिणी म्हणाली की, भारतातील (India) वातावरण पाश्चिमात्य देशात दाखवले जाते तसे नाही.

ती पुढे म्हणाली, "काही देश, स्वयंसेवी संस्था आणि अगदी संयुक्त राष्ट्र कधी कधी भारताची चुकीची प्रतिमा मांडतात. भारतामध्ये जाती-संबंधित समस्या आहेत, परंतु भारतात चांगल्या गोष्टीही आहेत. एक दलित म्हणून मी त्याचा एक भाग आहे."

PM Modi
PM Modi Speech: कर्नाटकात PM मोदी गरजले, विरोधकांवर जोरदार निशाणा; त्यांनी केवळ...

दुसरीकडे, रोहिणी घावरी स्वतःला आंबेडकरवादी म्हणवते. ती जिनिव्हा येथे पीएचडी करत आहे. तिचे वडील इंदूरमध्ये स्वच्छता कर्मचारी आहेत.

अनेक सोशल मीडिया (Social Media) यूजर्संनी तिच्या ट्विटर प्रोफाइलवरुन मनुस्मृतीच्या दहनाचे समर्थन करणारे ट्विट दाखवणारे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. एवढ्या मोठ्या रकमेतून केवळ एकाच विद्यार्थ्याला मदत करण्याऐवजी केंद्र अनेक विद्यार्थ्यांना मदत करु शकले असते, असेही काहीजण म्हणाले.

PM Modi
PM Modi Roadshow Video: पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, जोरदार स्वागत अन् पृष्पवृष्टी, पाहा व्हिडिओ

एका यूजरने घावरीच्या ट्विटला टॅग करत लिहिले की, "या दलित मुलीला भारत सरकारकडून उच्च शिक्षणासाठी 1 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळते आणि तरीही हे सरकार दलित वर्गातील लोकांचा तिरस्कार करते."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com