
जयपूरमधील एका 23 वर्षीय तरुणीने राजस्थानचे मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्यावर गेल्या वर्षभरात अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी (Police) 'झिरो एफआयआर' नोंदवली आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरची माहिती राजस्थान (Rajasthan) पोलिसांना देण्यात आली असून ते पुढील तपास करतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 328, 312, 366, 377 आणि 506 अंतर्गत उत्तर जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात 8 मे रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी राजस्थानचे मंत्री महेश जोशी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
तसेच, रोहित जोशीने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षी 8 जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. गेल्या वर्षी फेसबुकच्या माध्यमातून रोहितशी मैत्री झाली होती आणि तेव्हापासून दोघे संपर्कात असल्याचे तरुणीने सांगितले. तक्रारीनुसार, दोघे जयपूरमध्ये (Jaipur) पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर रोहितने तिला 8 जानेवारी 2021 रोजी सवाई माधोपूरला बोलावले होते.
"पंजाबचं पुनरुज्जीवन होऊ शकतं...: सिद्धू उद्या घेणार मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेटएफआयआरनुसार, मुलीचा आरोप आहे की, 'पहिल्या भेटीत रोहितने माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले त्यानंतर फायदा घेतला. एफआयआरनुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा आरोपीने नग्न फोटो आणि व्हिडिओ दाखवून धमकावले.' तरुणीचा आरोप आहे की, 'रोहितने मला एकदा दिल्लीत भेटूनही असे करण्यास भाग पाडले होते.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.