सावरकरांना बदनाम केलं गेलं आणि आता... मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

आजच्या काळात भारतात वीर सावरकरांविषयीच्या (Swatantryaveer Savarkar) माहितीचा खरोखरच अभाव आहे.
Rss chief Mohan Bhagwat
Rss chief Mohan BhagwatDainik Gomantak

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र काही महापुरुषांच्या योगदान आजही वादातितच राहिले आहे. यामधील एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar). देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावकरांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांना माहिती व्हावी यासाठी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Rss chief Mohan Bhagwat) म्हणाले, आजच्या काळात भारतात वीर सावरकरांविषयीच्या माहितीचा खरोखरच अभाव आहे. आणि ही एक मोठी समस्या आहे. मात्र आता सावरकरांबद्दल लिहिलेल्या या तीन पुस्तकांमधून बरीच माहिती मिळू शकते,

स्वातंत्र्यकाळापासून वीर सावरकरांना फक्त नि फक्त बदनाम करण्याची मोहीम राबविली जात आहे. आता यानंतर स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda), स्वामी दयानंद सरस्वती (Swami Dayanand Saraswati) आणि योगी अरविंद (Yogi Arvind) यांना बदनाम करण्यात येत आहे. वीर सावरकर या तीन महापुरुषांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. ते पुढे म्हणाले की, सावरकरजींचे हिंदुत्व आणि विवेकानंदांचे हिंदुत्व एकसमानच आहे, आणि हे हिंदुत्व आधीही एक होते आणि शेवटपर्यंत एकच राहणार असल्याची माहिती यावेळी बोलताना भागवतांनी दिली.

Rss chief Mohan Bhagwat
विवाहासाठी हिंदूंनी धर्मांतर करणे चूकीचे : मोहन भागवत

ते म्हणाले की, 'जो भारताचा आहे, त्याची सुरक्षा आणि प्रतिष्ठा भारताशीच संबंधित आहे. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना पाकिस्तानातही प्रतिष्ठा नाही. जे भारताचे आहेत ते भारताचे आहेत.'

दरम्यान, मोहन भागवत म्हणाले की, ''आमची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे, परंतु आपले पूर्वज एकच आहेत. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्यांना तेथे प्रतिष्ठा मिळाली नाही. हिंदू धर्म हा शाश्वत आहे. ते पुढे म्हणाले की, आम्हाला माहित आहे की आता 75 वर्षांनंतर हिंदुत्वाबद्दल गर्जना करुन बोलण्याची गरज आहे.''

Rss chief Mohan Bhagwat
कलम 370 हटवल्यानंतर RSS प्रमुख मोहन भागवत पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरात

लग्नासाठी धर्मांतर

याआधी आरएसएस सर संघचालक मोहन भागवत यांनी लग्नासाठी होत असलेल्या धर्मांतराबद्दल चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले की लग्नासाठी धर्म बदलणे योग्य आहे का? हिंदू मुले आणि मुली धर्म बदलत आहेत? आणि छोट्या- छोट्या स्वार्थासाठी हे घडत आहे. आणि असं करणारी मुलं आणि मुली हे चुकीचे करत आहेत.

धर्माचा अभिमान बाळगण्याची शिकवण आवश्यक

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, आम्ही आमच्या मुलांना तयार करत नाही. आपण त्यांना स्वतःचा आणि त्यांच्या धर्माचा अभिमान बाळगायला शिकवण्याची गरज आहे. त्याचवेळी मोहन भागवत यांनी उत्तराखंडमध्ये आयोजित कौटुंबिक प्रबोधन कार्यक्रमात कुटुंबासाठी सहा मंत्र दिले. त्यांनी भाषा, अन्न, भजन, दौरा, भूशा आणि भवनातून आपल्या मुळांशी जोडलेले राहण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) म्हणाले की, वीर सावरकर जी एक महान स्वातंत्र्य सेनानी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com