रुचिरा कंबोज बनल्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या नव्या राजदूत

1987 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) यांची न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Ruchira Kamboj
Ruchira KambojDainik Gomantak

United Nations: 1987 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) यांची न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. रुचिरा सध्या भूतानमध्ये भारताच्या राजदूत आहेत, त्या लवकरच संयुक्त राष्ट्राची जबाबदारी स्वीकारतील. संयुक्त राष्ट्रातील भारताचे विद्यमान राजदूत टीएस तिरुमूर्ती यांचा विस्तारित कार्यकाळ लवकरच संपत आहे.

कोण आहे रुचिरा कंबोज?

रुचिरा 1987 च्या सिव्हिल सर्व्हिसेस बॅचच्या टॉपर आहेत. भूतानमध्ये राजदूत होण्यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) भारताचे उच्चायुक्त, युनेस्कोमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. रुचिरा या भूतानमधील भारताच्या (India) पहिल्या महिला राजदूत आहेत.

Ruchira Kamboj
एसडीएमच्या नोकरीपासून ते अर्थमंत्री पदापर्यंत, जाणून घ्या यशवंत सिन्हा यांचा राजकीय प्रवास

फ्रान्समधून करिअरची सुरुवात केली

पॅरिसमधून (Paris) त्यांनी तिसरे सचिव म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. या काळात त्यांनी फ्रेंच भाषेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या फ्रान्समधील भारतीय दूतावासात दुसऱ्या सेक्रेटरी बनल्या. यानंतर, त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात अप्पर सचिव म्हणून पश्चिम युरोप विभागाच्या कामावर देखरेख ठेवली. यानंतर रुचिरा प्रथम सचिव (अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक) म्हणून मॉरिशसमध्ये पोहोचल्या. यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Ruchira Kamboj
राष्ट्रपती निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांचा मोठा इशारा

संयुक्त राष्ट्रांमध्ये काम करण्याचा अनुभव

रुचिरा यांनी 2002-2005 पासून संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या स्थायी मिशनमध्ये सल्लागार म्हणून काम केले आहे. जिथे त्यांनी UN शांतता राखणे, UN सुरक्षा परिषद सुधारणा, मध्य पूर्व संकट इत्यादींसह अनेक राजकीय विषयांवर काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com