रशियाचे काश्‍मीरप्रश्नी भारताला समर्थन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

काश्‍मीर प्रश्‍नावर रशियाने पुन्‍हा भारताचे समर्थन केले आहे. पाकिस्तानने काश्‍मीरसारखे द्विपक्षीय मुद्दे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) चर्चेत उपस्थित करु नयेत या भूमिकेला रशियाने पाठिंबा दिला आहे.

नवी दिल्ली :  काश्‍मीर प्रश्‍नावर रशियाने पुन्‍हा भारताचे समर्थन केले आहे. पाकिस्तानने काश्‍मीरसारखे द्विपक्षीय मुद्दे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) चर्चेत उपस्थित करु नयेत या भूमिकेला रशियाने पाठिंबा दिला आहे. असे करणे समूह सिद्धांताच्या मूलभूत तत्वाविरोधात होईल, असेही रशियाने म्हटले आहे.  रशियाच्या अध्यक्षतेखाली ‘एससीओ’ची शिखर परिषद आभासी पद्धतीने मंगळवारी (ता. १०) झाली. द्विपक्षीय मुद्दे अनावश्यकपणे ‘एससीओ’च्या व्यासपीठावरुन सातत्याने उपस्थित करण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिका केली होती. 

संबंधित बातम्या