रशिया स्फुटनिक -5 लसीला भारतात लवकरच मिळू शकते मान्यता 

दैनिक गोमंतक
सोमवार, 29 मार्च 2021

रशियन कोरोना व्हायरस प्रतिबंधक-लस स्फुटनिक-5 ला येत्या काही आठवड्यात भारतीय औषध नियामकांकडून मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. फार्मा सेक्टर कंपनी डॉ. रेड्डीजच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

हैदराबाद : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली यांसह अनेक राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.  भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर काहीसा दिलासा मिळेल असे वाटत होते, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा देशात थैमान घातले आहे. अशातच कोरोना लसीबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रशियन कोरोना व्हायरस प्रतिबंधक-लस स्फुटनिक-5 ला येत्या काही आठवड्यात भारतीय औषध नियामकांकडून मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. फार्मा सेक्टर कंपनी डॉ. रेड्डीजच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.  (Russia Sputnik-5 vaccine may soon be approved in India)

शरद पवार रुग्णालयात दाखल; 31 मार्चपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचा डॉक्टरांचा सल्ला 

कंपनीचे सीईओ, एपीआय आणि सर्व्हिसेस, दीपक सापरा यांनी याबाबत माहिती दिली आहे. रशियन कोरोना व्हायरस प्रतिबंधक-लस स्फुटनिक -5 ला येत्या काही आठवड्यात मान्यता मिळण्याची शक्यता आहे.  ही दोन डोसची लस असेल. पहिल्या डोस घेतल्यानंतर आपण 21 व्या दिवशी दुसरा डोस घ्याल. लस घेण्याच्या 28 ते 42 व्या दिवसादरम्यान प्रतिकारशक्ती विकसित होईल. तर ही दोन डोसची लस आहे आणि पुढील काही आठवड्यात ती मिळेल अशी आम्हाला आशा आहे.'' असे दीपक सापरा यांनी म्हटले आहे.  डॉ. रेड्डीज कंपनीने  स्फुटनिक -5 लस भारतात आणण्यासाठी रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाशी करार केल्याचे देखील यावेळी सापरा यणी सांगितले आहे. 

काश्मीरच्या सोपोरमध्ये कौन्सलरवर दहशतवादी हल्ला; कौन्सलर आणि एक सैनिक शहीद

दरम्यान, भारतातही या लसीच्या चाचण्या सुरु झाल्या असून डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने या लशीच्या चाचणीची जबाबदारी घेतली आहे. रशियाची स्फुटनिक- 5  ही लस  92 टक्के परिणामकारक असल्याचा रशियाने दावा केला आहे.  सध्या ही लस बाजारात आली आहे. त्याचबरोबर भारतातही लवकरच ही लस उपलब्ध होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.   

संबंधित बातम्या