Delhi: RAW अधिकाऱ्याने 10 व्या मजल्यावरुन मारली उडी, जागीच मृत्यू

Research And Analysis Wing: रॉ (Research And Analysis Wing) च्या अधिकाऱ्याने दिल्लीत आत्महत्या केली आहे.
Crime
CrimeDainik Gomantak

Research And Analysis Wing: रॉ (Research And Analysis Wing) च्या अधिकाऱ्याने दिल्लीत आत्महत्या केली आहे. रॉ अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाच्या 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या लोधी रोडवर RAW चे कार्यालय आहे.

अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी काही मीडिया रिपोर्ट्समधून सांगितले जात आहे की, ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. मात्र, याबाबत अद्याप स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही. RAW अधिकाऱ्याच्या मृत्यूची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे. RAW अधिकारी त्यांच्या कामाबाबत नैराश्यात होते की, त्यांच्या काही कौटुंबिक समस्या होत्या, ज्यामुळे ते नैराश्यात होते? याबाबत आत्तापर्यंत काहीही माहिती नाही.

Crime
Delhi Crime: धक्कादायक ! प्रेयसीचे 35 तुकडे केले, अन् दररोज…!

दरम्यान, कार्यालयाच्या 10 व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सध्या रॉ अधिकाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. रॉ अधिकाऱ्याने कार्यालयात असे पाऊल उचलल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे काम करणारे इतर लोकही हैराण झाले असल्याचे बोलले जात आहे.

Crime
Delhi News: दिल्लीकरांचा प्रवास महागणार, केजरीवाल सरकारने घेतला मोठा निर्णय

सीबीआय अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला

या वर्षी सप्टेंबर महिन्यात सीबीआय (CBI) अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. सीबीआयच्या कायदेशीर सल्लागाराचा मृतदेह त्यांच्या दक्षिण दिल्लीतील निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सीबीआयच्या लोधी रोड कार्यालयात उप विधी सल्लागार म्हणून तैनात जितेंद्र कुमार यांच्याबद्दल सांगण्यात आले की, ते मूळचे हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी जिल्ह्यातील आहेत. मृत्यूनंतर एक सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरले नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com