भारताला लवकरच मिळणार 'आयर्न डोम' सारखे सुरक्षा कवच; रशिया देणार S-400 क्षेपणास्त्र

दैनिक गोमंतक
शनिवार, 22 मे 2021

भारताला मिळणारे हे क्षेपणास्त्र (S-400 Missile) रशियाची (Russia) आतापर्यंतची सर्वात प्रगत सुरक्षा यंत्रणा आहे.

येणाऱ्या डिसेम्बर महिन्यापर्यंत भारताच्या (India) हवाई सुरक्षेत (security) आणखीन भर पडणार असल्याचे समजते आहे. भारताच्या भूभागावरून हवाई हल्ला (Attack) करण्याची क्षमता असणाऱ्या अत्याधुनिक (Advance) एस-400 (S-400) मिसाईल (Missile) डिसेम्बर पर्यंत भारतात पोहोचणार आहे. रोसोबोरॉनएक्स्पोर्टचे (Rosoboronexport) सीईओ अलेक्झेन्डर मिखेयेव यांनी सर्वकाही नियोजीत वेळे प्रमाने सूरु आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे. एस-400 मिसाईल भूभागावरून हवेत दूर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ट्रायम्फ मिसाईल प्रणाली 400 किमी दूर पर्यंत शत्रूच्या विमानावर मारा करू शकते. (S-400 missile will arrive in India in December)

भारताला मिळणारे हे क्षेपणास्त्र रशियाची (Russia) आतापर्यंतची सर्वात प्रगत सुरक्षा यंत्रणा आहे. भारताचे सुरक्षातज्ञ रशियाला पोहोचले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. ट्रायम्प मिसाईल प्रणाली हवाई क्षेत्रात तब्बल 400 किमी पर्यंत हल्ला करून विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोन नष्ट करू शकते. भारतीय सुरक्षा तज्ञांनी रशियामध्ये जाऊन हे क्षेपणास्त्र वापरण्यासाठीचे प्रशिक्षण सुरु केले आहे.    

या क्षेपणास्त्राबद्दलच्या विशेष गोष्टी 
1. दूरवर मारा करण्याची अत्याधुनिक प्रणाली असणारे हे क्षेपणास्त्र 400 किमी पर्यंत मारा करू शकते. 
2. या क्षेपणास्त्रातून 40 किमी, 120 किमी, 250 किमी आणि 400 किमी अशा वेगवगेळ्या अंतरावर मारा करता येतो. 
3. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून एकाचवेळी तीन वेगवेगळ्या दिशांना मारा केला जाऊ शकतो. 
4. या क्षेपणास्त्राच्या प्रत्येक टप्प्यात 72 क्षेपणास्त्राचा समावेश असतो. 
5. हे क्षेपणास्त्र कार्यरत करण्यासाठी फक्त 5  ते 10 मिनिटांचा वेळ लागतो. 

Yass Cyclone: ओडिशातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

संबंधित बातम्या