अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ नये: एस जयशंकर

जयशंकर (S. Jaishankar) यांनी या विषयावर बोलताना , असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर अमेरिका आणि भारताचे विचार विभिन्न असल्याचे मतही स्पष्ट केले आहे .
अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ नये: एस जयशंकर
S. Jaishankar: India & USA have same thinking on Afghanistan in USISPF Annual Leadership SummitDainik Gomantak

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी गुरुवारी यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF Annual Leadership Summit) च्या वार्षिक नेतृत्व परिषदेत भाग घेतला. या परिषदेत त्यांनी , अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अलीकडील घडामोडींशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भारत (India) आणि अमेरिका (USA) यांचे समान मत असून अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी संभाव्य वापर करण्याच्या चिंतेचाही दोन्ही देशांच्या विचारात समावेश असल्याचे स्पष्ट केले आहे. (S. Jaishankar: India & USA have same thinking on Afghanistan)

त्याचबरोबर जयशंकर यांनी या विषयावर बोलताना , असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर अमेरिका आणि भारताचे विचार विभिन्न असल्याचे मतही स्पष्ट केले आहे . तसेच तालिबान राजवटीला मान्यता देण्याचा कोणताही प्रश्न प्रत्येकाने दोहा करारात दिलेल्या वचनपूर्तींच्या आधारावर सोडवला पाहिजे.असे ठाम मत यावेळी एस जयशंकर यांनी मांडले आहे.

एस जयशंकर म्हणाले, "मला वाटते की यापैकी अनेक मुद्द्यांवर आपण (भारत-अमेरिका ) सैद्धांतिक पातळीवर समान दृष्टिकोन ठेवतो. त्यात नक्कीच दहशतवादाचा समावेश आहे. दहशतवादासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर आपल्या दोघांकडून खूप प्रकर्षाने जाणवतो आणि जेव्हा यावर चर्चा झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती जोबायडन याची भेट घेतली आहे.

S. Jaishankar: India & USA have same thinking on Afghanistan in USISPF Annual Leadership Summit
कलम 370 हटवल्यानंतर RSS प्रमुख मोहन भागवत पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरात

पाकिस्तानचा उल्लेख करताना ते म्हणाले, "असे मुद्दे असतील ज्यांवर आम्ही अधिक सहमत आहोत, असे मुद्देही असतील ज्यांच्यावर आम्ही कमी सहमत आहोत. आमचे अनुभव काही बाबतीत (यूएस) पेक्षा वेगळे आहेत. आम्ही सीमापार दहशतवादाचा सामना करत आहोत. तो प्रदेश. आणि त्याने अफगाणिस्तानच्या काही शेजाऱ्यांबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनाला अनेक प्रकारे आकार दिला आहे. " परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की अमेरिकेने हे मत सामायिक करायचे की नाही हे ठरवायचे आहे.

Related Stories

No stories found.