Research: मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा आणि RT-PCR टेस्ट चा रिपोर्ट 3 तासात मिळवा

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 जून 2021

जगात कोरोना साथीचा (Covid-19) प्रादुर्भाव झाल्यापासून त्याच्यावरील उपचार, प्रतिबंध आणि तपासणीसाठी सातत्याने संशोधन केले जात आहे. जेणेकरुन त्याचा फायदा कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांना होइल.

नवी दिल्ली: जगात कोरोना साथीचा (Covid-19) प्रादुर्भाव झाल्यापासून त्याच्यावरील उपचार, प्रतिबंध आणि तपासणीसाठी सातत्याने संशोधन केले जात आहे. जेणेकरुन त्याचा फायदा कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांना होइल. कोरोनावरील उपचारासाठी देशात सतत संशोधन(Research) केले जात आहे. शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमांमुळे असे काही शोध लावण्यात आले आहेत, ज्यामुळे कोरोना आजारापासून दुर राहण्यास खूप मदत केली आहे. पुन्हा एकदा वैज्ञानिकांनी असाच एक पराक्रम केला आहे. (Saline Gargle salt water and get RTPCR test report in 3 hours)

मीठाच्या गुळण्या करून आरटीपीसीआर चाचणी 
नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) येथील शास्त्रज्ञांनी कोविड -19 ची चाचणी घेण्याची सोपी पद्धत शोधून काढली, ही मोठी कामगिरी आहे. या आरटी-पीसीआर चाचणीच्या पद्धतीमध्ये, मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास  (Saline Gargle) सँपल गोळा केले जावू शकते, तसेच ३ तासात त्याचा रीपोर्टही येणार. विशेष गोष्ट अशी आहे की या पद्धतीने चाचणी करण्याचे बरेच फायदे आहेत. पहिले तर टेस्ट करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि त्याचे रिझल्टही लवकरच मिळता. तसेच ज्या ग्रामीण आणि मागास भागांमध्ये मूलभूत सुविधा कमी आहेत त्यांनाही याचा फायदा होतो. 

New IT Rules: Google ने आपल्या हक्कासाठी ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा 

रुग्ण स्वतःच घेऊ शकतो सँपल
एनईईआरआय मधील पर्यावरण विषाणूशास्त्र कक्षाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार म्हणतात की, स्वॅब्ज गोळा करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्याच वेळी, नमुने घेणे आणि त्यांना प्रयोगशाळेत पाठविणे हे सोपे काम नाही. मात्र मीठाच्या गुळण्या केल्याने आरटी-पीसीआर पद्धतीत, रुग्ण स्वत: चा नमुना स्वत:च घेऊ शकतो. यासाठी, रुग्णाला एक साधारण नळी दिली जाते, ज्यामध्ये मीठाचं पाणी असते. रुग्णाला या मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या लागले आणि ते पाणी नळीमध्ये परत घालावे लागेल. त्या नंतर ही नळी प्रयोगशाळेत पाठविली जाईल आणि त्याटा टेस्ट रिपोर्ट 3 तासात उपलब्ध होईल. ही पद्धत पर्यावरणास अनुकूल आणि सोपी आहे. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय;निवृत्त अधिकाऱ्यांना लिहिण्यास बंदी 

आदिवासी भागासाठी खूप प्रभावी 
शास्त्रज्ञांना आशा आहे की हे अनन्यसाधारण चाचणी तंत्र विशेषत: अशा ग्रामीण आणि आदिवासींसाठी फायदेशीर ठरेल, ज्यांना अद्याप मूलभूत सुविधा नाहीत. त्याची उपयुक्तता पाहता, एनईईआरआयला देशभरातील इतर प्रयोगशाळांच्या वापरासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यास सांगितले गेले आहे. या प्रक्रियेस पुढे जाण्यास नागपूर महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. डॉ. खैरनार आणि त्यांच्या टीमला अशी आशा आहे की कोरोना तपासणीची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान बनविणारे हे तंत्रज्ञान राष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येईल. या कोरोना साथीच्या काळात आपल्याला या तंत्रज्ञानाची मदत होईल. 

 

 

संबंधित बातम्या