'हिंदुत्व बघायचं असेल तर...': सलमान खुर्शीद

सलमान खुर्शीद यांनी 'सनराईज ओव्हर अयोध्या' हे पुस्तक लिहिले असून, त्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे.
'हिंदुत्व बघायचं असेल तर...': सलमान  खुर्शीद
Salman Khurshid house Vendalisid In Nainital FIR against 20Dainik Gomantak

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid ) यांचे नैनिताल येथील घर जाळण्यात आले आहे . त्यांच्या घरावर दगडफेक देखील करण्यात आली आहे . सलमान खुर्शीद यांनी 'सनराईज ओव्हर अयोध्या' हे पुस्तक लिहिले असून, त्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे.वास्तविक सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली आहे. त्यांनी हिंदुत्वाचे राजकारण धोकादायक म्हटले आहे. (Salman Khurshid house Vendalisid In Nainital FIR against 20)

या प्रकरणी आता पोलिसांनी एका आरोपीसह 20 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या आरोपींविरुद्ध कलम147, 148, 427, 436, 452, 504 आणि 506अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणानंतर आता फॉरेन्सिक टीम संपूर्ण घराची कसून झडती घेणार आहे. याशिवाय सलमान खुर्शीद यांच्या घराभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घरावरील हल्ल्याची माहिती खुद्द सलमान खुर्शीद यांनीच दिली आहे.

सलमान खुर्शीद यांनी अयोध्या निकालावर पुस्तक लिहिले असून त्यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाइम्स' या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. अनेक संघटनांसह अनेक लोक या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. 'पुस्तकात प्रकाशित केलेली विधाने केवळ प्रक्षोभकच नाहीत तर हिंदूंमध्ये दुरावण्याची भावना निर्माण करणारी आहेत', असा आरोप करण्यात आला आहे.

Salman Khurshid house Vendalisid In Nainital FIR against 20
'मी हिंदुत्वाला कधीच दहशतवादी संघटना म्हटले नाही': सलमान खुर्शीद

सलमान खुर्शीद यांच्या या पुस्तकाचा ठिकठिकाणी लोक निषेध करत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामसारख्या कट्टरपंथी जिहादी गटांशी केल्याचा आरोप आहे. ही टिप्पणी पृष्ठ 113 वर "द केशर स्काय" या प्रकरणात करण्यात आली आहे. मात्र यावर बोलताना सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे की, "संतांसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि शास्त्रीय हिंदू धर्माला हिंदू धर्माच्या सशक्त आवृत्तीपासून वेगळे केले जात होते, अलिकडच्या वर्षांत तर अगदी ISIS आणि बोको हराम सारख्या गटांच्या जिहादी इस्लामसारखेच."

या साऱ्या घटनेनंतरच त्यांच्या नैनितालच्या घरावर जाळपोळ आणि दगडफेक झाली आहे. त्याविरोधात सलमान खुर्शीद यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याचा पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com