सलमान खुर्शीद यांचे मत अतिशयोक्ती असल्याचे सांगत कॉंग्रेसचे नेते त्यांच्यापासून दूर

हिंदुत्वचा संबंध ISIS आणि जिहादी इस्लामशी जोडणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी म्हणले आहे.
सलमान खुर्शीद यांचे मत अतिशयोक्ती असल्याचे सांगत कॉंग्रेसचे नेते त्यांच्यापासून दूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी ही अतिशयोक्ती ठरवून ही तुलना पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे.Dainik Gomantak

नवी दिल्ली: काँग्रेस (Congress) नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नव्या पुस्तकावरुन गदारोळ झाला आहे. याप्रकरणी खुर्शीद यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही खुर्शीद यांच्यापासून दूर गेले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी ही अतिशयोक्ती ठरवून ही तुलना पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी ही अतिशयोक्ती ठरवून ही तुलना पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे.
हिंदुत्व हे ISIS आणि बोको हरामशी सारखे; सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात टिप्पणी

गुलाम नबी आझाद म्हणाले, “हिंदू धर्माची जिहादी इस्लामशी तुलना करणे चुकीचे आहे. हिंदुत्व ही राजकीय विचारधारा म्हणून आम्ही सहमत असू शकत नाही, परंतु त्याचा संबंध ISIS आणि जिहादी इस्लामशी जोडणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्तीपूर्ण आहे.

सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या नवीन पुस्तक 'सनराईज ओव्हर अयोध्या, नेशनहूड इन अवर टाइम्स'मध्ये म्हटले आहे की, हिंदुत्व सनातन आणि ऋषींच्या प्राचीन हिंदू धर्माला वेगळे करत आहे. जे प्रत्येक प्रकारे दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखे आहे. हिंदुत्वाचा प्रभाव असलेल्या काँग्रेस नेत्यांवरही त्यांनी टीका केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी ही अतिशयोक्ती ठरवून ही तुलना पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपला तरीही नेते तो का उकरून काढतात...!

यासोबतच काँग्रेस नेत्याने या पुस्तकात अयोध्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाचेही कौतुक केले आहे. अयोध्येवरील निकालावर प्रतिक्रिया देताना सलमान खुर्शीद यांनी या जागेवर आता भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे असे म्हणले आहे. खुर्शीद यांनी या पुस्तकात लिहिले आहे की, काँग्रेसमध्ये एक वर्ग असा आहे, ज्याने पक्षाची प्रतिमा अल्पसंख्याक समर्थक पक्ष अशी झाली आहे, याची खंत आहे. हे लोक आमच्या नेतृत्वाच्या सार्वजनिक ओळखीचा पुरस्कार करतात. या लोकांनी अयोध्येवरील निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करत, आता या जागेवर भव्य मंदिर बांधले जावे, असे जाहीर केले. परंतु मशिदीसाठीही जमीन देण्याचे निर्देश देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या भागाकडे दुर्लक्ष केले.

दिल्लीचे वकील विवेक गर्ग यांनी खुर्शीद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सलमान खुर्शीद यांच्याविरोधात दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com