धक्कादायक! कोरोनाच्या सरकारी रूग्णालयात माळी घेतायेत सैंपल

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

मध्य प्रदेशातील कोरोनाच्या वाढत्या घटनांनी आरोग्य सेवांबाबत केलेल्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे

मध्य प्रदेशातील कोरोनाच्या वाढत्या घटनांनी आरोग्य सेवांबाबत केलेल्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे. मध्यप्रदेशातील कोरोना रुग्णांची रोजची आकडेवारी ही 6 हजार पार आहे.  मध्यप्रदेशमध्ये कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे आता कोरोनाचे चे सैंपल हॉस्पिटलमध्ये माळी (गार्डेनेर) गोळा करत आहेत. मध्य प्रदेशातील सांची जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयात असे दृश्य पाहायला मिळाले, जेथे बागेत कोरोनाचे सैंपल गोळा केले जात आहेत. त्याचबरोबर राज्याचे आरोग्यमंत्री साथीच्या काळात दमोहमध्ये राजकीय प्रचारात  व्यस्त आहेत.(Samples taken by gardeners at the government hospital in Corona)

कुंभमेळ्यात 102 भाविक कोरोना पॉझिटिव्ह

नमुना गोळा करणारे मलका राम हे  रुग्णालयाचे कर्मचारी नाहीत. आपण हा नमुना का घेत आहात असे जेव्हा त्यांना विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले  रुग्णालयातील बहुतेक कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे, मी एक माळी असून कायम कर्मचारीही नाही. त्याचवेळी रुग्णालयातील ब्लॉक मेडिकल ऑफिसर (बीएमओ) राजश्री तिडके यांनी यांनी सांगितले. माळ्यांना सैंपल घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या म्हणाला आम्ही काय करू शकतो,  रुग्णालयातील बहुतेक कर्मचारी कोरोनाने संक्रमित आहेत.आपत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हाला माळ्यासह इतर कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे लागले.

आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या जिल्ह्यात शासकीय रुग्णालय आहे , त्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रभूराम चौधरी करतात, जे सध्या पोट-निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. डॉ. चौधरी हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निकटचे मानले जातात. कमलनाथ सरकार पडण्यापूर्वी त्यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला होता. रविवारी दमोहमध्ये ते अनेक ठिकाणी महिला परिषदांना संबोधित करताना दिसले. 

 

त्याचबरोबर या विषयावर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मी अशा एखाद्याचा शोध घेत आहे जो मला सांगू शकेल की राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी गेल्या दिवसांत कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली आहे किंवा आढावा बैठक घेतली आहे का? अशी टीका कॉंग्रेसचे नेते सय्यद जफर यांनी भाजपवर केली आहे. जर मला कोणी सांगितले तर मी त्याला 11 हजार एक रुपयांचे बक्षीस देईन. सोमवारी मध्य प्रदेशात सर्वाधिक 6,489 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात 3,01,0762 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत आणि 38,651 रूग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

संबंधित बातम्या