संयुक्त किसान मोर्चाकडून उद्या 'भारत बंद'.

दैनिक गोमंतक
गुरुवार, 25 मार्च 2021

दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला शुक्रवारी 120 दिवस पूर्ण होणार आहेत.

दिल्ली: केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या(farm Act) विरोधात उद्या शेतकऱ्यांनी बंदचे आवाहन केले आहे. या बंद मध्ये देशभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत. सर्व दुकान, व्यापार आणि व्यवसायिक क्षेत्र उद्या बंद असतील. दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला(Farmer Protest)  शुक्रवारी  120 दिवस पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने या बंदचे आवाहन केले आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा बंद असणार आहे. 

सप्टेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने(Central Government) कृषीविषयक 3विधेयक पारित केले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप करत पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले. पुढे या शेतकऱ्यांनी दिल्लीत दाखल होत दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर आंदोलनाला सुरुवात केली. दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या या आंदोलनाला उद्या 120दिवस पूर्ण होणार आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात आजपर्यंत  चर्चेच्या 10 फेऱ्या पूर्ण झाल्या, मात्र तरीही शेतकऱ्यांची कुठलीही मागणी पूर्ण न झाल्याने शेतकरी वेगवेगळ्या  मार्गांनी निदर्शने करत या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने 28 एप्रिलला होळीच्या मुहूर्तावर कृषी विधेयकाच्या प्रति जाळत सरकारचा निषेध करणार आहे. 

दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या बंद मध्ये निवडणूका सुरु असलेले राज्य वगळता इतर सर्व राज्यातील लोक सहभागी होतील, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे.  या आधी झालेल्या 'भारत बंद'(Bharat Bandh) मध्ये उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशला बंद मधून वगळण्यात आलेले होते. मात्र, यावेळी दिल्लीत सुद्धा या बंदचे परिणाम दिसून येतील असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही कंपनी किंवा कारखाना या बंद मध्ये  बंद राहणार नाही, तसेच  पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स, जनरल स्टोअर्स यासारख्या आवश्यक सेवा देखील सुरु राहतील. तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ्यांच्या पुरवठ्यावर याबंदचा परिणाम होऊ शकतो.  

  "संघाचा उल्लेख 'परिवार' म्हणून करणार नाही"

संबंधित बातम्या