Elon Musk च्या कंपनीला भार्गवांनी केला रामराम

Elon Musk च्या कंपनीला भार्गवने केला रामराम

Dainik Gomantak 

Elon Musk च्या कंपनीला भार्गवांनी केला रामराम

भार्गव यांनी लिंक्डइनवर पोस्ट शेअर करता माहिती दिली.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति एलन मस्कची (Elon Musk) कंपनी स्टारलिंकची समस्या भारतात कमी होत नाहीय. परवानगीशिवाय सॅटेलाइट इंटरनेटचे प्री-बूकिंग केल्याबद्दल कंपनीवर सरकारकडून आधीच हल्ला झाला होता. पण आता कंपनीने अशा ग्राहकांना पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यामध्ये स्टारलिंक इंडियाचे (Starlink India) प्रमुख संजय भार्गव यांनी तीन महिन्यात नोकरी सोडण्याची घोषणा केली.

लिक्डइनवर दिली माहिती

भार्गव यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा लिंक्डइनवरील पोस्टमध्ये ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की, 'मी वयक्तिक कारणांमुळे स्टारलिंक इंडियाच्या बोर्डचे कंट्री डायरेक्टर आणि अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबर 2021 हा माझा कंपनीसोबत शेवटचा दिवस होता. मला अजूनही काही सांगायचे नाही.

यापूर्वी सुद्धा मस्कसोबत केले काम

भार्गव यांनी 1 ऑक्टोबर 2021 रोजी स्टारलिंक इंडियाचा पदभार स्वीकारला होता. आता बरोबर तीन महिन्यात त्यांनी हे पद सोडले आहे. त्याने यापूर्वीही मस्कसोबत काम केले आहे. भार्गव हा Paypal सुरू करणाऱ्या जागतिक संघाचा भाग आहे.

<div class="paragraphs"><p>Elon Musk च्या कंपनीला भार्गवने केला रामराम</p></div>
'ताजमहाल' बांधणाऱ्या मुघल शासकाचा आज वाढदिवस...

* वादांनी वेढलेला अल्प कालावधी

भार्गव यांचा हा तीन महिन्यांचा कार्यकाल सोपा नव्हता. यादरम्यान, स्टारलिंकने भारतात आपली सेवा सुरू करण्याची घोषणा केली आणि सॅटेलाइट (Satellite) इंटरनेटसाठी प्री-बूकिंग घेणे सुरू केले. याबाबत भारत सरकारला काही संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. यानंतर सरकारने स्पष्टपणे सांगितले की ते मंजुरीशिवाय प्री-बूकिंग घेऊ शकत नाहीत.

स्टारलिंक ग्राहकांना पैसे परत करत आहे

स्टारलिंक इंडियाने आधीच आधीच सुमारे 7000 भारतीय लोकांकडून प्री-बूकिंग ऑर्डर घेतली होत्या. अशा ग्राहकांकडून कंपनीने 99 डॉलर घेतेले होते. सरकारने या ग्राहकांना पैसे (Money) परत करण्यास सांगितले होते. योगायोगाने, कंपनीने या आठवड्यात ग्राहकांना पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. ही कंपनी (Company) लवकरच भारतात लाइसेन्ससाठी अर्ज करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com