संजय राऊत थोड्याच वेळात गाझीपुर बॉर्डरवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.  

नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.  शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत आज 1 वाजता गाझीपुर बॉर्डरवरील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यसभा खासदार संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.असे संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

6 फेब्रुवारीला संयुक्त शेतकरी मोर्चाकडून देशव्यापी चक्का जाम

"शेतकऱ्याना अत्यंत वाईट वागणूक मिळत आहे. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कोणाची परवानगीची गरज नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आणखी किती त्रास देणार आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे", असे म्हणत मोदी सरकारला संजय राऊतांनी टोला लगावला.  महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. ठाकरे सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्या सूचनेवरुन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला भेट देणार आहेत. असे संजय राउत यांनी ट्विट केले आहे.  

रत्नागिरीतील बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी धडक मोहिम सुरू

केंद्र सरकारच्या तीन नविन कृषी कायद्यांविरोधात हे शेतकरी एकवटले आहेत. यावर अजून तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत तीन नवे कृषी कायदे रद्द करत नाहीत, तोपर्यत आंदोलनातून माघार घेणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. सरकार नवे कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचं सांगत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या कायद्यांचं समर्थन केल्याचं ते सांगतात. पण हे फक्त आमचं आंदोलन कमकुवत करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत, असं शेतकरी नेते जोगिंदर सिंह यांनी सांगितलं.

आज गाझीपुर बॅार्डरवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. शेतकरी दिल्लीकडे जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी रस्त्यावर खिळे टाकले आहेत. पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या