Chief Minister Yogi Adityanath: योगींना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

Uttar Pradesh: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला यूपी पोलिसांनी अटक केली आहे.
Chief Minister Yogi Adityanath
Chief Minister Yogi AdityanathDainik Gomantak

Chief Minister Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला यूपी पोलिसांनी अटक केली आहे. लखनौच्या सायबर सेलने आरोपी सर्फराजला राजस्थानमधील भरतपूर येथून अटक केली आहे. सफराजने डायल 112 च्या व्हॉट्सअ‍ॅपवर सीएम योगींना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 2 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून सायबर टीम सफराजच्या शोधात होती. सायबर टीमने सर्फराजला राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूर येथून अटक करुन लखनौला (Lucknow) आणले. लखनऊ पोलीस आता सरफराजची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्फराजचे वडील पेशाने डॉक्टर आहेत. विशेष म्हणजे, शनिवारीही मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. काही अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. हिंदूवादी नेते देवेंद्र तिवारी यांच्या घरावर बॅग फेकून हे धमकीचे पत्र देण्यात आले आहे. याच देवेंद्र तिवारी यांनी अवैध कत्तलखान्यांबाबत जनहित याचिका दाखल केली आहे.

Chief Minister Yogi Adityanath
Yogi Adityanath: सीएम योगींची मोठी घोषणा, जिल्ह्यांमध्ये मिळणार मोफत डायलिसिस सुविधा

दुसरीकडे, लखनौच्या आलमबाग भागात राहणारे देवेंद्र तिवारी यांना धमकीचे पत्र मिळाले असून त्यात त्यांना आणि सीएम योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना बॉम्बने उडवले जाईल, असे लिहिले आहे. देवेंद्र तिवारी यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असून, त्यानंतर पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Chief Minister Yogi Adityanath
Yogi Government मधील आमदार अन् खासदार घेतायेत मोदी सरकारच्या योजनेचा लाभ

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र तिवारी आणि सीएम योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव सलमान सिद्दीकी आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. गेल्या 6 दिवसांत यूपीमधून 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com