'मोदी है तो मुमकिन है'; “दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही...विकला तर नसेल ना…”,

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

महाराष्ट्रामधील युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटरवरुन मोदी है तो मुमकिन है असं म्हणून सूर्य दिसला नसल्याचा खोचक शब्दांमध्ये मोदींना टोला लगावला आहे.

मुंबई: राज्यात चार  ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिल्याने राज्यातील अनेक भागांत गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी एक ते दीड तास पावसाने जोरदार झोडपले. हिवाळ्यात अकस्मात पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. काही रस्त्यांवर आणि चौकांमध्ये पाणी साचले. दरम्यान संपूर्ण राज्यातच काही दिवसांपासून ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. कमी दाबाचे क्षेत्रामुळे गुलाबी थंडीच्या दिवसांत महाराष्ट्रासोबतच देशातील विविध भागांत अशा हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. थंडीच्या वाटेत दिवसात राज्यात ‘हिवाळी पावसाळा’ अवतरला आहे.

 

मुंबईसोबत कोकण विभागात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी सोमवारी पावस पडला. हवामान विभागाच्या माहीतीनुसार राज्यातील पावसाची स्थिती ८ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे, दरम्यान राज्यात सर्वच भागात पाऊस पडण्याची  शक्यता  वर्तविली जात आहे. नेहमीप्रमाणे या पावसाळी, ढगाळ वातावरणामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी दोन दिवसांपासून सुर्याचं दर्शन झालेलं नाही.

मात्र या वातावरणावरून पावसाळी मुद्द्यावरुन काँग्रेसच्या एका नेत्याने थेट पंतप्रधानांवर सुर्य विकला की काय असा निशाणा साधला आहे. महाराष्ट्रामधील युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटरवरुन मोदी है तो मुमकिन है असं म्हणून सूर्य दिसला नसल्याचा खोचक शब्दांमध्ये मोदींना टोला लगावला आहे.

सत्यजित तांबे यांनी, “दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही…
विकला तर नसेल ना…”, असं ट्विट  केलेलं आहे.

तांबे यांच्या ट्विटवर नेटकरी प्रतिक्रिया देतांना दिसत आहे, ट्विटखालील रिप्लायमध्ये भाजपा समर्थक आणि काँग्रेस समर्थक टीका करताना दिसत आहेत.

 

संबंधित बातम्या