Satyendar Jain: सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली, एलएनजेपी रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले!

Satyendar Jain Latest Health Update: केजरीवाल सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.
Satyendra Jain
Satyendra JainDainik Gomantak

Satyendar Jain Latest Health Update: केजरीवाल सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गुरुवारी सकाळी बाथरुममध्ये घसरल्याने त्यांना पहिल्यांदा दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी बाथरुममध्ये घसरले

गेल्या एक वर्षापासून तिहार तुरुंगात बंद असलेल्या जैन यांना अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेलच्या बाथरुममध्ये ते घसरुन पडले.

यानंतर डॉक्टरांनी (Doctors) त्यांची प्रकृती तपासली असता ते ठिक ठाक असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. मात्र, जैन यांनी डॉक्टरांना पाय, पाठ आणि खांदे दुखत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांना दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Satyendra Jain
Arvind Kejriwal: 'मला दिल्लीच्या जनतेने निवडून दिले, तुम्ही कोण...'; एलजींवर भडकले केजरीवाल

रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले

त्यानंतर, सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एलएनजेपी रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिथे त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना स्लिप डिस्कमुळे खूप वेदना होत आहेत.

Satyendra Jain
Manish Sisodia Delhi Excise Case: मनीष सिसोदिया यांना मोठा झटका, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ!

सत्येंद्र जैन गेल्या एक वर्षापासून तुरुंगात आहेत

दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने गेल्या वर्षी 30 मे 2022 रोजी अटक केली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांना अटक करण्यात आली.

त्यांच्यावर फेब्रुवारी 2014 ते मे 2017 या कालावधीत वेगवेगळ्या नावे वेगवेगळ्या मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी सत्येंद्र जैन यांनी 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी न्यायालयाला जामीन देण्याची विनंती केली. मात्र, त्या अर्जावर न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com