बेळगावचे सौंदत्ती यल्लम्मा मंदिर ३१ डिसेंबरपर्यंत बंद

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

कोरोना संसर्गामुळे सौंदत्ती यल्लम्मा (रेणुका) मंदिर ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे यंदा माही पौर्णिमेला होणारी रेणुका यात्राही रद्द झाली आहे.

बेळगाव :  कोरोना संसर्गामुळे सौंदत्ती यल्लम्मा (रेणुका) मंदिर ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे यंदा माही पौर्णिमेला होणारी रेणुका यात्राही रद्द झाली आहे. कंकणविधी आणि मंगळसूत्र विसर्जन विधी केवळ मंदिर व्यवस्थापनाच्या उपस्थितीत होणार असून, महाराष्ट्रातील भाविक यंदा रेणुका यात्रेला मुकणार आहेत.

दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या माही पौर्णिमेच्या यात्रेला महाराष्ट्रातील लाखो भाविक उपस्थिती दर्शवितात. सुमारे चार ते पाच लाख भाविक तीन दिवसांत देवीचे दर्शन घेतात. यानंतर महिनाभर देवीचे दर्शन बंद राहते, तर जानेवारीत होणाऱ्या पौर्णिमा यात्रेत बेळगावसह उत्तर कर्नाटकातील भाविक देवीचे दर्शन घेतात.

अधिक वाचा :

रजनीकांत राजकिय एन्ट्रीच्या तयारीत

सरकारने बिनशर्त चर्चा करावी ; दिल्लीतील आंदोलक शेलकऱ्यांची मागणी

संबंधित बातम्या