लव्ह यू जिंदगी म्हणत कोरोनाशी लढा देणाऱ्या महिलेने दिला जगाला निरोप

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

व्हिडिओ सामाजिक मध्यामांवर प्रचंड व्हायरल झाला होता. तिचा हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांमध्ये थोडी सकारात्मकता निर्माण झाली होती.

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (second wave) चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णामध्ये वाढ होत आहे.  दिल्लीतील कोविड आपत्कालीन कक्षात 30 वर्षीय महिला कोविड -19 विरुद्ध  लढा देत होती. तिची हिम्मत वाढवण्याकरीता तेथील डॉक्टरांनी बॉलीवुड मधील सुपरहिट चित्रपटामधील 'लव यू जिंदगी' हे गाण लावल होते. या गाण्यावर ती  बेडवरच मास्क लाऊन झुलत होती.हा व्हिडिओ सामाजिक मध्यामांवर (social media) प्रचंड व्हायरल झाला होता. तिचा हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांमध्ये थोडी सकारात्मकता (Positivity)निर्माण झाली होती. परंतु त्या महिलेचे गुरुवारी निधन झाल्याची माहिती डॉ. मोनिका लंगेह यांनी  दिली आहे.  (Saying love you zindgi, the woman who fought with Corona said goodbye to the world)

Covid-19 in children: लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे कशी ओळखाल? पालकांनी काय...

डॉ. मोनिका लंगेह यांनी त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली. त्यात त्या म्हणाल्या " मी खूप दुखू आहे, आपण एका शूर मुलीला गमावले आहे. ओम शांती तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा "त्यानंतर अनेकजणानी या ट्विटरवर दुख: व्यक्त केले आहे. डॉ. मोनिकाने  8 मे ला एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्या व्हिडिओमध्ये दिसणारी महिलेला आयसीयुत  बेड मिळात नसल्यामुळे तिला कोविड आपत्कालीन कक्षात दाखल केले होते. त्या महिलेला  NIV च्या सपोर्टवर ठेवले होते. तसेच त्या महिलेवर रेमडेसिवीर व प्लाझा थेरपी  देखील करण्यात येत होती. असे ट्विटरमध्ये सांगितले होते. परंतु त्यानंतर त्या महिलेला आयसीयू मध्ये बेड मिळाला होता. 

COVID-19 India: ''कोरोना एक जीव आहे, त्याला जगूद्या''  

डॉ. मोनिका यांना त्या महिलेने गाणे एकता येतील का असे विचारले असता त्यांनी बॉलीवुड मधील सुपरहिट चित्रपटामधील 'लव यू जिंदगी' हे गाण लावल होते. व्हिडिओमध्ये ती महिला ऑक्सीजन मास्क लावलेला असताना ती त्या गाण्यावर झुलत होती. दुर्दैवाने त्या महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. अनेकानी आपलं दुख: व्यक्त केले आहे.  

 

संबंधित बातम्या