CBSE 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक आज जाहीर होणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

सीबीएसई इयत्ता 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा अद्याप जाहिर झाल्या नसल्याने, तारखा कधी कळणार याबाबात गेले अनेक दिवस पालक-विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होत्या.

नवी दिल्ली : सीबीएसई इयत्ता 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा अद्याप जाहिर झाल्या नसल्याने, तारखा कधी कळणार याबाबात गेले अनेक दिवस पालक-विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. मात्र, आता आता ही प्रतिक्षा संपली असून, इयत्ता '10 वी व 12 वी'च्या बोर्डाच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक आज कळणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत ट्विट करत माहिती दिली होती. फेब्रुवारीला सीबीएसई इयत्ता '10 वी व 12 वी'च्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. हे वेळापत्रक तुमही cbse.nic.in या वेबसाईटवर पाहू शकाल. या परीक्षा 10 मे ते 10 जून दरम्यान घेतल्या जाणार आहेत.

अक्कड़ बक्कड़ बम्बे बो; पेट्रोल के दाम अब पुरे 100

कोरोनामुळे शाळा बंद कराव्या लागल्याने बऱ्याच शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नव्हता. काही दिवसांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले असले, तरी त्याबाबत पालकांच्या मनात शंका आहे. सीबीएसई इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षांबाबत विद्यार्थी व शिक्षकांची चिंता वाढत असल्याने केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गेल्या आठवड्यातच देशभरातील केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांना वेबिनारद्वारे संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. 

UnionBudget2021: सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे फसवणूक - काँग्रेस

दरम्यान,परीक्षांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जाहीर करण्यात आलेल्या 2020 च्या अभ्यासक्रमानुसार कमी झालेल्या अभ्यासक्रमावर आधारितच प्रश्न असतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत बोलताना ते म्हणाले होते की, “कोरोनाची पार्श्वभूमी बघता विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे, याची खात्री झाल्यावरच ऑनलाइन वर्ग सुरू ठेवायचे कि नाही याचा निर्णय घेतला जाईल”.

 

संबंधित बातम्या