असोळीत शाळा इमारत हवीच

Dainik Gomantak
शनिवार, 13 जून 2020

शाळा इमारतीस वन खात्याने विरोध केल्यास आंदोलन करण्याचा कारवार जिल्हा विधान परिषद सदस्य एस.एल.घोटणेकर यांचा इशारा.

जोयडा

असोळी (ता. जोयडा) येथे शाळा इमारत मंजूर झाली आहे. या इमारतीच्या बांधकामाला वन खात्याने आक्षेप घेणे सुरु केले आहे. काळी व्याघ्र संरक्षित प्रकल्पांतर्गत असे बांधकाम करता येत नाही असे वन खात्याचे म्हणणे आहे. वन खात्याच्या या आक्षेपामुळे काम रोखले तर जन आंदोलन करू असा इशारा कारवार जिल्हा विधान परिषद सदस्य एस.एल.घोटणेकर यांनी दिला आहे.

वन खात्याने वनांचे व वन्य जीवांचे संरक्षण करावे. गावातील विकासकामांना आडकाठी आणण्याचे काम वन खात्याने करू नये. सरकारी योजनेतून शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. भावी पिढीच्या शिक्षणासाठी ही सरकारची गुंतवणूक आहे. विद्यार्थ्यांना सुसज्ज अशा शाळा इमारतीची गरज आहे. ग्रामीण भागात शाळा बांधली जाते ही कौतुकास्पद गोष्ट आहे. गावच्या या विकासाच्या आड वन खात्याने येऊ नये असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

व्याघ्र प्रकल्पाला जनतेचा विरोध नाही. मात्र त्या प्रकल्पाच्या नावाखाली विकासकामांना विरोध केला जाऊ नये. हेच धोरण वन खात्याने कायम ठेवले तर जनतेला वन खात्याविरोधात आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

 

 

 

 

संबंधित बातम्या