15 ऑक्टोबपासून शाळा- महाविद्यालये सुरू होणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

शाळा आणि महाविद्यालये १५ ऑक्टोबरनंतर सुरू करता येऊ शकतील पण त्याआधी संबंधीत संस्थांच्या व्यवस्थापन मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नमुद केलेल्या सुचनांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांच्या लेखी परवानगीनेच शाळा- महाविद्यालयांमध्ये यावे असेही सांगितले आहे. शाळा सुरळीत सुरू होत नाहीत तोपर्यंत ऑनलाईन शिक्षणालाच प्राधान्य देण्यात यावे, अशी सुचनाही गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे.​

नवी दिल्ली- अनलॉकच्या पाचव्या टप्प्यातील शिथीलीकरणात केंद्र सरकारने मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या. यात शाळा, महाविद्यालये१५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मुभा मिळाली आहे. याबाबतची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवण्यात आली आहे. 

यात शाळा आणि महाविद्यालये १५ ऑक्टोबरनंतर सुरू करता येऊ शकतील पण त्याआधी संबंधीत संस्थांच्या व्यवस्थापन मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नमुद केलेल्या सुचनांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांच्या लेखी परवानगीनेच शाळा- महाविद्यालयांमध्ये यावे असेही सांगितले आहे. शाळा सुरळीत सुरू होत नाहीत तोपर्यंत ऑनलाईन शिक्षणालाच प्राधान्य देण्यात यावे, अशी सुचनाही गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे. ज्यांना घरीच राहून ऑनलाईन पद्धतीने शिकायचे आहे त्यांना घरी राहून शिकता यावे असेही या सुचनेत म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाशी चर्चा करून महाविद्यालये आणि उच्चशिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे असे गृहमंत्राने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम १५ ताराखेनंतर सुरू केले जाऊ शकतील.  सिनेमाहॉल, आर्ट गॅलरीज तसेच मनोरंजन संकुलेसुद्धा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. सिनेमाहॉल एकूण क्षमतेच्या अर्ध्या संख्येनेच सुरू करण्याची अट सुरू करण्यात आली आहे. पोहण्याचे तलावही चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक,  सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यात 100 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर मनाई करण्यात आली आहे. बंदिस्त सभागृह 50 टक्के आसनक्षमतेने सुरू करता येतील, अशा सुचना यात करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या