पेन्सिलचा वाद मिटवण्यासाठी शाळकरी मुलांनी गाठले पोलीस स्टेशन; केली गुन्हा नोंद करण्याची मागणी

कायद्याचा आदर आणि न्यायासाठी केलेला संघर्ष कधीच व्यर्थ जात नाही, भलेही तो मग पेन्सिलसाठी केलेला संघर्ष का असेना.
 school kids arrives at police station to solve pencil dispute WATCH Andhra Pradesh police What do
school kids arrives at police station to solve pencil dispute WATCH Andhra Pradesh police What doDainik Gomantak

कुरनूल: कायद्याचा आदर आणि न्यायासाठी केलेला संघर्ष कधीच व्यर्थ जात नाही, भले तो मग पेन्सिलसाठी केलेला संघर्ष का असेना. असाच एक प्रकार आपल्या देशात घडला आहे. आणि दोन लहान मित्र न्याय मागण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहचले आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक मुलगा आपली पेन्सिल परत मिळवण्यासाठी पोलिस स्टेशनचे दार ठोठावताना दिसत आहे.

 school kids arrives at police station to solve pencil dispute WATCH Andhra Pradesh police What do
केंद्र पुढील 5 वर्षांत आरोग्य क्षेत्रात 64,000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

आंध्र प्रदेशात शाळकरी मुलांमध्ये पेन्सिलच्या वादाचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. पेन्सिल परत न केल्याने एका मुलाने आपल्या मित्रावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. पोलिस ठाण्यात उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी या लहान मुलांचा वाद मिटवला. आंध्र प्रदेश पोलिसांनी आपल्या ट्विटरवर या प्रकरणाशी संबंधित पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हा सगळा प्रकार दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या काही मित्रांसह पेन्सिल परत मिळवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेला. ही घटना कुरनूल जिल्ह्यातील आहे. या ठिकाणी मुलांचा एक गट पोलिस ठाण्यात पोहोचला होता. जेव्हा शाळकरी मुलांचा एक गट त्यांच्या वर्गमित्राने पेन्सिल परत न दिल्याबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी स्टेशनमध्ये आला तेव्हा कुरनूल जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना पेन्सिल चोरीची ही घटना ऐकून आश्चर्य वाटले.

व्हिडिओमध्ये, एक मूलगा तक्रार करताना दिसत आहे, त्याच्या एका वर्गमित्राने त्याची पेन्सिल परत केली नाही असे तो अधिकाऱ्यांना सांगत आहे. त्याचा तो मित्रसुद्धा पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित होता, त्याने त्याची पेन्सिल घेतली आणि ती परत दिली नाही, असे तो वारंवार पोलिसांना समजावून सांगत असताना गुन्हा नोंदविण्याची मागणी तो करत आहे. जेव्हा पोलिस अधिकाऱ्याने मुलांना विचारले की त्यांनी या प्रकरणात काय करावे? तुमची इच्छा काय आहे, तेव्हा पीडित मुलाने आपल्या मित्रावर गुन्हा नोंदवला पाहिजे असे स्पष्टपणे सांगितले. संबंधित दोन्ही पक्ष पोलिसांसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांच्यासोबतची इतर मुले मात्र या व्हिडिओमध्ये हसताना दिसतात.

 school kids arrives at police station to solve pencil dispute WATCH Andhra Pradesh police What do
‘कोड फॉर कॉल’मध्ये गोव्यातील विद्यार्थ्यांचा ठसा

या प्रकरणाचा तपशील मिळाल्यानंतर पोलीस दोन्ही मुलांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यात शांततापुर्व मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु पीडित मुलगा, आपल्या तक्रारीवर ठाम असल्याचे या व्हिडिओमध्ये पहायला मिळते आहे. शेवटी पोलिस मुलाच्या आईला बोलावण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर पोलिसांनी यशस्वीरित्या या प्रकरणाचा तोडगा काढला. आणि दोन्ही मुलांमधले भांडण मिटवून त्याची मैत्री करून दिली. या सगळ्या प्रकारानंतर हे दोन्ही लहान मुलं हस्तांदोलन करताना आणि हसताना व्हिडोओमध्ये दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com