शाळा पुन्हा सुरू..!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा सहा महिन्यांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर आसाममधील शाळा इयत्ता ६ वी त्यापुढील इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत.

आसाम :  कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा सहा महिन्यांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर आसाममधील शाळा इयत्ता ६ वी त्यापुढील इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोरोना विषाणूच्या मार्गदर्शक सूचनांचे नेहमीच पालन होईल, याची काळजी घ्यावी असे निर्देश शिक्षण विभागाला दिले. 

राज्य सरकारने हे देखील नमूद केले की शाळा पुन्हा सुरू करणे ऐच्छिक तत्त्वावर आहे आणि  विद्यार्थी केवळ पालकांच्या संमतीनेच उपस्थित राहतील. सीएम सोनोवाल यांनी शिक्षण विभागाला सकाळी लवकर वर्ग सुरू होण्याचे निर्देश दिले जेणेकरून वर्ग वेळेत योग्य अंतर राखता येईल.

इयत्ता ६ वी त्यानंतरच्या इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी सकाळी ८:३० ते दुपारी १२:३० आणि दुपारी १:३० ते दुपारी ४:३० या दोन तुकड्यांमध्ये शाळेत येतील. प्रत्येक वर्गात केवळ 25 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. शालेय परीक्षा फक्त इयत्ता ८ वी व १० वी - १२ वीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात येईल.
 

संबंधित बातम्या