शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला मागे

 शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला मागे
Schools will remain closed in Tamil Nadu

चेन्नई: तमिळनाडूत कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता तमिळनाडू सरकारने येत्या १६ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्याचवेळी विद्यापीठातही ठराविक अभ्यासक्रमच २ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. 


केंद्र सरकारने शाळा सुरू करण्याचे गेल्या महिन्यातच राज्यांना परवानगी दिली. २१ सप्टेंबरपासून काही राज्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले. गृहमंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाकडून  मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. अर्थात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी राज्यांवर सोपवण्यात आली. मात्र कोरोनाचे वाढते गांभीर्य लक्षात घेता काही राज्यांनी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com