दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपला. या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

पाटणा: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपला. या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी  प्रचारसभांचा धडाका लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या आज अनेक सभा झाल्या. याशिवाय या पक्षांच्या, विशेषत: भाजपच्या इतर नेत्यांनीही सभा घेतल्या.

संबंधित बातम्या