हिंसक वातावरणात पश्चिम बंगालमध्ये पार पडला मतदानाचा दुसरा टप्पा

west bengal election.jpg
west bengal election.jpg

पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा आज पार पडला. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पश्चिम बंगाल  राज्यातील वेगेवेगळ्या मतदान केंद्रांवर 80 टक्के मतदान झाले असल्याचे समजते आहे. तर दुसरीकडे आसाम मध्ये 73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नेहमी प्रमाणे यावेळी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये निवडणुकी दरम्यान हिंसक घटना घडल्याचे पाहायला मिळाले. (The second phase of polling took place in West Bengal in a violent atmosphere)

पश्चिम बंगालच्या 30 विधानसभा मतदार संघांत तर आसामच्या 39 मतदार संघांत आज विधानसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा आज पार पडला. राजकीय मंडळींच्या हत्येच्या घटना, उमेदवारांवर झालेले हल्ले, राजकीय पक्षांदरम्यान झालेल्या चकमकी, मतदान केंद्रांवर झालेले गोंधळ, मतदारांना आणि मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि लोकांना मारहाण करणे, लोकांना प्रभावित करण्यासाठी पैशाचे वाटप करणे, यासारख्या घटनांमध्ये गुरुवारी पश्चिम बंगालमधील 30 जागांसाठी मतदान पार पडले. दुसर्‍या टप्प्यातील सर्वात महत्वाची  जागा असलेल्या नंदीग्राम येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत 80.79 टक्के मतदान झाले असल्याचे समजते आहे. नंदीग्राम मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या विरोधात  भारतीय जनता पक्षाचे सुवेंदू अधिकारी हे निवडणुकीत उतरलेले आहेत. 

गुरुवारी मतदानादरम्यान  हिंसक (Violence) घटनांमध्येही वाढ होताना दिसली. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशपूरच्या दादपूर झोनमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप भाजपवर लावण्यात आला आहे.  याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केल्याचे समजते आहे. तर नंदीग्रामच्या नंबर ब्लॉकमध्ये, एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरात मृतदेह फासावर लटकेला आढळला. तृणमूल कॉंग्रेस (Trunmul Congress) समर्थकांच्या धमकीमुळे अत्म्हत्यातग्रस्त व्यक्तीने हे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केला आहे. तर नंदीग्राम (Nandigram) मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुवेंदू (Suvendu Adhikari) अधिकारी यांच्या वाहनांचे सुद्धा  नुकसान झाल्याचे समजते आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com